राज्यस्तरीय शालेय रग्बी स्पर्धेवर कोल्हापूरचाच वरचष्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 06:26 PM2018-11-22T18:26:26+5:302018-11-22T18:27:43+5:30
जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत १४, १७, १९ वर्षांखालील मुले-मुलींमध्ये कोल्हापूर विभाग संघाने यश मिळविले.
कोल्हापूर : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत १४, १७, १९ वर्षांखालील मुले-मुलींमध्ये कोल्हापूर विभाग संघाने यश मिळविले.
कोल्हापूर विभाग संघाने चौदा वर्षांखालील मुलांमध्ये श्रीराम हायस्कूल, कोपार्डे संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. या संघात सचिन पाटील, आदित्य शिंदे, पृथ्वीराज माने, विश्वजित सुतार, समर्थ पाटील, प्रथमेश शिंदे, विजय जामदार, अवधूत पोवार, कौशल पाटील, हर्षवर्धन दळवी, तुषार पाटील, रोहित पाटील यांचा समावेश होता; तर १७ वर्षांखालील गटातही याच शाळेच्या मुलांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या विजयी संघात स्वप्निल पाटील, आदित्य चौगले, प्रणव पाटील, विजय पाटील, सुदर्शन पाटील, तेजस पाटील, नीलेश पाटील, प्रथमेश शिंदे, श्लोक कांबळे, प्रज्ज्वल माने, स्वराज साळोखे, विनायक पाटील यांचा समावेश होता; तर मुलींमध्ये पाडळी खुर्दच्या न्यू इंग्लिश स्कूलने द्वितीय क्रमांक पटकाविला.
एकोणीस वर्षांखालील मुलांमध्ये श्रीराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कुडित्रे या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. विजयी संघात किरण मोरबाळे, रोहित मुद्राळे, संकेत पाटील, दिगंबर देसाई, संकेत घोटवडेकर, ओंकार चौगले, तुषार पाटील, अविराज साबळे, सूरज लोहार, नीलेश चौगले, आदित्य पाटील, पृथ्वीराज पाटील यांचा समावेश होता; तर मुलींमध्ये न्यू कॉलेज संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला.
ओळी : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत १४, १७, १९ वर्षांखालील मुले-मुलींमध्ये कोल्हापूर विभाग संघाने यश मिळविले. या संघांसोबत जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे, मधुरिमाराजे, प्रा. अमर सासने, प्रशिक्षक दीपक पाटील, आदी उपस्थित होते.