शहरात उच्चांकी १५६ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:17 AM2021-07-18T04:17:36+5:302021-07-18T04:17:36+5:30

कोल्हापूर : कोल्हापूरकरांनी एकदा मनावर घेतलं की ते कार्य पूर्ण करतात, भले ते कोणतेही असो, याचीच प्रचिती शनिवारी आली. ...

The highest number of 156 people donated blood in the city | शहरात उच्चांकी १५६ जणांनी केले रक्तदान

शहरात उच्चांकी १५६ जणांनी केले रक्तदान

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूरकरांनी एकदा मनावर घेतलं की ते कार्य पूर्ण करतात, भले ते कोणतेही असो, याचीच प्रचिती शनिवारी आली. ‘लोकमत’ने रक्तदानासाठी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत फुलेवाडी रिंगरोडवरील विजयसिंह उर्फ रिंकू देसाई व मित्रपरिवाराने तब्बल १५६ अशा शहरातील उच्चांकी रक्तपिशव्यांचे संकलन केले.

‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त विजयसिंह उर्फ रिंकू देसाई व मित्रपरिवार यांच्यावतीने फुलेवाडी रिंगरोडवर गंगाई लॉनमध्ये रक्तदान शिबिर झाले. शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण व करवीरचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करुन शिबिराचा प्रारंभ झाला. यावेळी रिंकू देसाई यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्राथमिक शिक्षक बॅंकेचे उपाध्यक्ष बाजीराव कांबळे, शिंगणापूर सरपंच प्रकाश रोटे, मानसिंग पाटील, माजी नगरसेवक रमेश पुरेकर, बाबासाहेब बुचडे, सुहास देशपांडे, विकास पांगे, मेजर वसंतराव देसाई आदी यावेळी उपस्थित होते.

सकाळपासूनच रक्तदान करण्यासाठी युवकांनी गर्दी केली होती. युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचेही सदस्य उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी तानाजी फाले, संजय पाटील, बंडोपंत दळवी, रंगराव पाटील, संजय फाले, ओंकार पोवार, संतोष जाधव, भीमराव पाटील, समीर मुल्ला, उदय कांबळे, महेश पाटील, प्रकाश जुगर, हिराजी लांबोरे, बयाजी शेळके, दीपक गावडे, इंद्रजित पाटील, प्रकाश बोडके, शरद गडकर आदींनी मेहनत घेतली.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचा सहभाग

या रक्तदान शिबिरात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे सुनील कांबळे यांच्या नेतृत्वाखाली १२ जणांनी रक्तदान करुन सहभाग नोंदवला.

आपटे नगर टेम्पो असोसिएशनचा ग्रुप सहभागी

या शिबिरामध्ये आपटे नगर टेम्पो असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष विशाल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ११ सदस्यांनी रक्तदान केले.

‘रिंकू’चे पंधराव्यांदा रक्तदान

विजयसिंह उर्फ रिंकू देसाई यांनी आतापर्यंत १४ वेळा रक्तदान केले आहे. शनिवारी शिबिरातील १५१ वे व स्वत:चे पंधरावे रक्तदान त्यांनी केले.

सर्वसामान्यांचा सहभाग

या शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याशिवाय भाजी विक्रेते, रिक्षा व्यावसायिक, कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला.

फोटो नं.१७०७२०२१-कोल-फुलेवाडी ब्लड कॅप०१

ओळ : ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त विजयसिंह उर्फ रिंकू देसाई व मित्रपरिवार यांच्यावतीने शनिवारी फुलेवाडी रिंगरोडवर गंगाई लॉनमध्ये आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी करवीरचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, रिंकू देसाई, मानसिंग पाटील, आदी उपस्थित होते.

फोटो नं.१७०७२०२१-कोल-फुलेवाडी ब्लड कॅप०२

ओळ : रक्तदान शिबिरात युवकांनी उत्स्फूर्तपणे रांगा लावून रक्तदान केले.

फोटो नं.१७०७२०२१-कोल-फुलेवाडी ब्लड कॅप०३

ओळ : एकाचवेळी दहा बेडवर रक्तदान केले जात होते.

फोटो नं.१७०७२०२१-कोल-फुलेवाडी ब्लड कॅप०४

ओळ : आयोजक रिंकू देसाई याने पंधराव्यांदा रक्तदान केले.

Web Title: The highest number of 156 people donated blood in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.