जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा उच्चांक, २२७४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:26 AM2021-05-13T04:26:04+5:302021-05-13T04:26:04+5:30

गेल्या आठवड्यात येथील शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेतील यंत्रणा निर्जंतुकीकरण करण्यासाठी तीन दिवस बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रलंबित असलेले ...

The highest number of corona patients in the district, 2274 positive | जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा उच्चांक, २२७४ पॉझिटिव्ह

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा उच्चांक, २२७४ पॉझिटिव्ह

googlenewsNext

गेल्या आठवड्यात येथील शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेतील यंत्रणा निर्जंतुकीकरण करण्यासाठी तीन दिवस बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रलंबित असलेले सात हजार स्वॅब रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यात पाठविण्यात आले होते. त्यातील शेवटचे १५०० हून अधिक अहवाल बुधवारी प्राप्त झाले. त्यातील पॉझिटिव्ह आणि दैनंदिन स्वॅबमधील स्थानिक प्रयोगशाळेतील पाॅझिटिव्ह अहवाल यामुळे हा आकडा पावणे तेविसशेवर गेला आहे.

कोल्हापूरपाठाेपाठ सर्वाधिक २०६ रुग्ण इतर जिल्हा आणि राज्यातील आढळले असून, इचलकरंजीत १४१ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. करवीर तालुक्यात २५२, तर हातकणंगले तालुक्यात २१३ रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. चंदगड १२०, गडहिंग्लज १५८, कागल १६१, पन्हाळा १२९, शिरोळ २०० अशी नव्या रुग्णांची आकडेवारी आहे.

चौकट

जिल्ह्यातील ५१ जणांचा मृत्यू

कोल्हापूर १४

फुलेवाडी, संभाजीनगर, शिवाजी पेठ, गुजरी, नाना पाटील नगर, सदर बझार, साने गुरुजी वसाहत ०२, राजोपाध्येनगर ०२, राजारामपुरी, माळी कॉलनी टाकाळा, डी मार्ट रंकाळा, महालक्ष्मीनगर

करवीर ०७

हिरवडे खालसा, खेबवडे, कंदलगाव, उजळाईवाडी, उचगाव २, गडमुडशिंगी

हातकणंगले ०६

पट्टणकोडोली २, नवे पारगाव, हेर्ले २, वाठार

इचलकरंजी ०६

कारंडे मळा, जवाहर हनुमान चौक, दत्तनगर, पाटील मळा, विक्रमनगर

पन्हाळा ०४

जाफळे, पन्हाळा, कोडोली, भाचरवाडी

शिरोळ ०४

निमशिरगाव २, टाकवडे, जयसिंगपूर

गडहिंग्लज ०३

वडरगे, गडहिंग्लज, तेरणी

भुदरगड ०३

शेणगाव, गारगोटी, कडगाव

शाहूवाडी ०२

विशाळगड, थेरगाव

आजरा ०२

सुळे, भिगुर्डे

इतर राज्ये, जिल्हे ०७

नाशिक, कांदेकर मळा कोंढवे पुणे, बोरगाव, गुहाघर, तोरसे, जानव्हल, लाडेवाडी

चौकट

गर्दी टाळण्याचीच गरज

शनिवारी रात्रीपासून लॉकडाऊन होणार म्हणून सरसकट नागरिकांनी बाहेर न पडता दक्षता घेण्याची गरज आहे. घरातील एकाच व्यक्तीने घराबाहेर सर्व ती काळजी घेऊन बाहेर पडून आवश्यक खरेदी करून घरी येण्याची गरज आहे. जर सर्वच जनता बाहेर पडणार असेल तर या गर्दीतून आणखी कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरज असणाऱ्यांनीच बाहेर पडणे हिताचे ठरणार आहे.

Web Title: The highest number of corona patients in the district, 2274 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.