कोरोनाने सर्वाधिक मृत्यू कोल्हापूर शहरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:29 AM2021-07-07T04:29:31+5:302021-07-07T04:29:31+5:30
कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात २७ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक मृत्यू कोल्हापूर शहरात झाले आहेत. ...
कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात २७ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक मृत्यू कोल्हापूर शहरात झाले आहेत. त्यापाठोपाठ गडहिंग्लज तालुक्यात मृत्यू झाले आहेत. चोवीस तासात १,६७५ जणांना कोरोनाची लागण झाली तर २,०९२ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या एकूण १३ हजार ७७९ जण उपचार घेत आहेत.
कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. अलिकडे रोज मृत्यूंची संख्या दोन अंकीच आहे. कोरोना आजार नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. संशयित रूग्णांचा शोध घेऊन त्यांना वेळीच उपचारासाठी दाखल करण्याकडे कल वाढला आहे. यामुळे रूग्णांची संख्या वाढत आहे. कोल्हापूर शहरातील अनेक भाग अजूनही हॉटस्पाॅट बनले आहेत. यामुळेच राजारामपुरीतील दोघांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. याउलट गगनबावडा तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने खाली आली आहे. केवळ तीन रूग्ण नव्याने सापडले आहेत. कुरूंदवाड, हुपरी, पेठवडगाव, मुरगूड अशा मोठ्या गावांत रूग्णांची संख्या कमी झाली आहे. डोंगराळ तालुका असूनही पन्हाळा तालुक्यात ११७ रूग्ण सापडले आहेत. ज्या तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, तेथे बाधितांचे प्रमाण अधिक आहे, असे आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे.
चौकट
कोरोनाने मृत्यू झालेल्या शहरातील रूग्णाचा परिसर आणि ग्रामीण भागातील रूग्णांची गावे अशी : कोल्हापूर शहर : जुना बुधवार पेठ, कसबा बावडा, शाहूपुरी, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, राजारामपुरी दोन, सुभाषनगर, फुलेवाडी.
करवीर : कळंबा, वडणगे.
हातकणंगले : भादोले, कोरोची
शिरोळ : जयसिंगपूर, आलास.
गडहिंग्लज : औरनाळ, हरळी बद्रुक, मुगळी, गडहिंग्लज, खमलेहट्टी, बसर्गे, शेंद्री.
आजरा : आजरा.
राधानगरी : नरतवडे.