महामार्ग मृत्युंजय दूत हे प्रवाशांसाठी देवदूतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:27 AM2021-09-04T04:27:57+5:302021-09-04T04:27:57+5:30
: उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचा उपक्रम लोकमत न्यूज नेटवर्क उचगाव : महामार्ग मृत्युंजय दूत हे जनसेवेचे देवदूत आहेत. ...
: उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचा उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
उचगाव :
महामार्ग मृत्युंजय दूत हे जनसेवेचे देवदूत आहेत. महामार्ग पोलिसांना व अपघातग्रस्तांसाठी देवदूताचा नेहमीच मदतीचा हात असतो. सर्वसामान्य वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे प्रतिपादन अभिनेत्री डॉ. रश्मी तिवारी यांनी केले.
उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राच्यावतीने आयोजित महामार्ग मृत्युंजय दूत संकल्पना व हेल्मेट व सीटबेल्ट घालून आलेल्या वाहनधारकांच्या सत्कार समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सपोनि चंद्रकांत शेडगे होते. यावेळी हेल्मेट घालून आलेल्या दुचाकीचालकांचा व मृत्युंजय दूत यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास सपोनि कविता नाईक, पोलीस उपनिरीक्षक सुरेश नलवडे, पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत शिरगुप्पी, पोलीस उपनिरीक्षक सुनील माळगे, पीएसआय जिरगे (मॅडम), शंकर कोळी,
चित्रपट निर्माता दिग्दर्शक अभिनेता प्रवीण भंसाली, अस्मी पंडित, राष्ट्रीय ज्योतिषतज्ज्ञ मानसी पंडित, सामाजिक कार्यकर्त्या वैष्णवी खेडेकर, संगीता सूर्यवंशी, डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, ॲड. शैलेश पंडित व सर्व पोलीस कर्मचारी, युवा ग्रामीण विकास संस्थेचे कर्मचारी, महामार्ग मृत्युंजय दूत मोहन सातपुते उपस्थित होते.
प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक सुरेश नलवडे व आभार शंकर कोळी यांनी मानले.
फोटो : उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राच्यावतीने हेल्मेट नियमाचे पालन करणाऱ्या दुचाकीचालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सिनेअभिनेत्री डॉ. रश्मी तिवारी, सपोनि चंद्रकांत शेडगे, सपोनि कविता नाईक, सुरेश नलवडे आदी उपस्थित होते.