‘केएमटी’ची भाडेवाढ उद्यापासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:14 AM2018-09-08T00:14:02+5:302018-09-08T00:14:06+5:30

The hike in KTT from tomorrow | ‘केएमटी’ची भाडेवाढ उद्यापासून

‘केएमटी’ची भाडेवाढ उद्यापासून

googlenewsNext

कोल्हापूर : भाडेवाढ होणार म्हणून गेले महिनाभर गाजत असलेल्या केएमटी बस भाडेवाढीची अंमलबजावणी उद्या, रविवारपासून होत आहे. डिझेलच्या वाढत्या दरांमुळे ‘केएमटी’चा प्रवास दोन रुपयांनी महागणार आहे.
केएमटी उपक्रमाच्या सुधारित प्रवासी भाडे दरपत्रकास प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची मान्यता यापूर्वीच मिळाली होती. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या मान्यतेने रविवारपासून त्याची अंमलबजावणी होत आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या वार्षिक ओळखपत्राचा आकार २५ रुपयांवरून ५० रुपये करण्यात आला आहे. तसेच पाससाठी आवश्यक असलेल्या ‘आरएफआयडी’ कार्डचा दर ४५ रुपयांवरून ६० रुपये केला आहे.
टप्पा क्रमांक जुना दर नवीन दर
१ ७.०० ८.००
२ ८.०० ८.००
३ १०.०० १०.००
४ ११.०० १२.००
५ १२.०० १४.००
६ १४.०० १६.००
७ १६.०० १८.००
८ १८.०० २०.००
९ १९.०० २२.००
सवलतीचे पास दर
एकदिवसीय पास - ३५ रुपये
एकदिवसीय पास (अर्ध आकार) - २० रु.
साप्ताहिक पास - २०० रुपये
पाक्षिक पास - ४०० रुपये
मासिक पास - ७४० रुपये
त्रैमासिक पास - २०५०
आठवी ते दहावी विद्यार्थी - ३५० रुपये

Web Title: The hike in KTT from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.