दुर्गम भागातील नागरिकांना हिल रायडर्सचा आधार, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 06:13 PM2020-06-04T18:13:33+5:302020-06-04T18:18:10+5:30
कोरोना व्हायरसमुळे ग्रामीण भागातील जनजीवनावरही परिणाम झाला आहे. येथील नागरिकांना हिल रायडर्सचा आधार मिळत आहे. त्यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आजरा तालुक्यातील अवंडी येथील धनगरवाडा परिसरात ८० किटचे वाटप करण्यात आले. यावेळी अभिनेता भरत जाधव यांची उपस्थिती होती.
कोल्हापूर : कोरोना व्हायरसमुळे ग्रामीण भागातील जनजीवनावरही परिणाम झाला आहे. येथील नागरिकांना हिल रायडर्सचा आधार मिळत आहे. त्यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आजरा तालुक्यातील अवंडी येथील धनगरवाडा परिसरात ८० किटचे वाटप करण्यात आले. यावेळी अभिनेता भरत जाधव यांची उपस्थिती होती.
दुर्गम वाड्या-वस्त्यांमध्ये नागरिकांना मदतीसाठी कोल्हापुरातील हिल रायडर्स ॲडव्हेंचर्स फौंडेशनने पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यात भुदरगड, पाटगांव परिसरात मदत पोहोचविण्यात आली. आजरा तालुक्यातील अवंडी येथून दुसऱ्या टप्प्यातील मदत वाटपाला सुरुवात झाली.
लक्ष्मी इंजिनिअरिंग सर्व्हिस येथे लागणारी ८० किट तयार करून दिली. यावेळी हिल रायडर्सचे प्रमोद पाटील, विनोद कांबोज, सागर बगाडे, हेमंत शहा, पार्थ शहा, हृषिकेश केसरकर, चंदन मिरजकर, सचिन नरके, संदीप कारेकर, सुनील शिंत्रे, वृषाल हुक्केरी, अनिल मगर उपस्थित होते.