पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचा शुभारंभ, जय भवानी...जय शिवाजी'चा जयघोष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 04:19 PM2022-07-02T16:19:00+5:302022-07-02T16:20:28+5:30

घनदाट धुके, थंडगार वारा व पावसाच्या सरी अशा निसर्गरम्य वातावरणात मोहिमेचा शुभारंभ

Hillriders Adventure Foundation Launches Panhalgad to Pavankhind Walk | पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचा शुभारंभ, जय भवानी...जय शिवाजी'चा जयघोष

पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचा शुभारंभ, जय भवानी...जय शिवाजी'चा जयघोष

googlenewsNext

पन्हाळा : घनदाट धुके, थंडगार वारा व पावसाच्या सरी अशा निसर्गरम्य वातावरणात 'जय भवानी...जय शिवाजी...शिवाजी महाराज की जय, हर..हर..महादेव, नरवीर शिवाकाशीद व बाजीप्रभु देशपांडे की जय...या घोषणांनी संपुर्ण पन्हाळगड दणादणून गेला होता. हिलरायडर्स अँडव्हेंचर फौंडेशनची पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंतीचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. पन्हाळगडावर कोसळणाऱ्या या धो-धो पावसात देखील सकाळी पाच वाजल्या पासून या मोहिमेत सहभागी होणाऱ्या साहसवीरांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी जिल्हाधिकारी रेखावार यांनी मोहिमेस शुभेच्छा देताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहासाचा मोहिमेत सहभागी झालेल्यांना उजाळा मिळणारच आहे तो आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. प्लास्टिकचा वापर बंद करा निर्सगाशी एकरुप व्हा व निरोगी आयुष्य जगण्याचा साहसीविरांना संदेश दिला.

दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल रेखावार व प्रदुषण नियंत्रण विभागाचे प्रादेशिक संचालक जगन्नाथ साळोखे यांच्या हस्ते वीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन  करण्यात आला. यावेळी पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी, हिलरायडर्स चे अध्यक्ष प्रमोद पाटील, प्रमोद माने, सागर बगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

मोहिमेचे सलग ३८ वे वर्ष असुन ही ५८ वी मोहिम आहे. सकाळी ठिक साडेनऊ वाजता मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहीमेची माहिती फौंडेशनचे विनोद कांभोज यांनी दिली. त्यानंतर सुरज ढोली यांनी सर्व मोहिमेतील साहसवीरांना ध्येय मंत्राचे पठण केले. मोहिमेत महाराष्ट्रासह, कर्नाटक, गोवा, गुजरात राज्यातील सहाशे साहसवीरांनी सहभाग नोंदवला. सकाळी ही मोहीम गडाच्या पश्चीमेस असलेल्या फुटका नंदी, पुसाटी बुरुज, तुरुकवाडी, म्हाळुंगे, मसाई पठार कडे रवाना झाली.  

Web Title: Hillriders Adventure Foundation Launches Panhalgad to Pavankhind Walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.