पन्हाळा येथील ऐतिहासिक वास्तू १५ मे पर्यंत पर्यटकांसाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 11:04 AM2021-04-17T11:04:11+5:302021-04-17T11:05:12+5:30
PanhalaFort Kolhapur : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे पुरातत्त्व विभागाने खबरदारीचा उपाय म्हणुन पर्यटकांना ऐतिहासिक वास्तुत प्रवेश करण्यास १५ मे पर्यंत बंदी करण्याचे आदेश संचालक एन.के. पाठक यांनी दिले. या आदेशाप्रमाणे पन्हाळा येथील ऐतिहासिक वास्तू १५ मे पर्यंत पर्यटकांसाठी बंद केल्याचे विभागीय आधिकारी विजय चव्हाण यांनी सांगीतले.
पन्हाळा : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे पुरातत्त्व विभागाने खबरदारीचा उपाय म्हणुन पर्यटकांना ऐतिहासिक वास्तुत प्रवेश करण्यास १५ मे पर्यंत बंदी करण्याचे आदेश संचालक एन.के. पाठक यांनी दिले. या आदेशाप्रमाणे पन्हाळा येथील ऐतिहासिक वास्तू १५ मे पर्यंत पर्यटकांसाठी बंद केल्याचे विभागीय आधिकारी विजय चव्हाण यांनी सांगीतले.
पन्हाळा येथील ऐतिहासिक वास्तुंना पर्यटक भेटी देतात. इतर किल्ल्यांच्या तुलनेत पन्हाळगडावर येणाऱ्या पर्यटकांचा व ऐतिहासिक वास्तु अभ्यासकांचा ओघ जास्त आहे. देशाच्या विविध भागातून येणाऱ्या पर्यटकांमुळे कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
पुरातत्त्व विभागाचे आदेश प्राप्त होताच पुरातत्त्वच्या कोल्हापूर व कोकण विभागाचे संरक्षण सहायक विजय चव्हाण यांनी पन्हाळगडावरील सर्व ऐतिहासिक वास्तू पर्यटकांना प्रवेशासाठी बंद केल्याचे सांगितले. पन्हाळगडाबरोबरच देशातील ३६९१ ऐतिहासिक वास्तु १५ मे पर्यंत बंद राहणार आहेत.