ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, स्मारके, संग्रहालये सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:15 AM2021-02-05T07:15:55+5:302021-02-05T07:15:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील सर्व ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, किल्ले, स्मारके, संग्रहालये मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे ...

Historical buildings, forts, monuments, museums started | ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, स्मारके, संग्रहालये सुरू

ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, स्मारके, संग्रहालये सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यातील कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील सर्व ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, किल्ले, स्मारके, संग्रहालये मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटी व शर्तीसह पर्यटक व नागरिकांसाठी खुले करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी दिले.

या ठिकाणी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारे निर्गमित केलेल्या व शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत निर्गमित केल्या जाणाऱ्या मानक कार्यप्रणालींचा अवलंब करणे बंधनकारक राहील तसेच या ठिकाणी आवश्यक शारीरिक अंतर बाळगणे, मास्क वापरणे व वेळोवेळी हात निर्जंतुकीकरण करणे सर्व संबंधितांवर बंधनकारक राहणार असेल.

--

लॉकडाऊनमध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत वाढ

जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. यापूर्वी प्रतिबंधित बंद क्षेत्र व सूट वगळण्यात आलेली क्षेत्र कायम ठेवण्यात येत आहेत. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद आहे.

---

Web Title: Historical buildings, forts, monuments, museums started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.