होडावडे गावाला ऐतिहासिक महत्त्व
By admin | Published: April 27, 2015 09:51 PM2015-04-27T21:51:59+5:302015-04-28T00:27:07+5:30
मोहन नाईक : पर्यटन महोत्सवाचा थाटात प्रारंभ
तळवडे : होडावडे गावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या गावाची महती सावंतवाडी संस्थानशी निगडित आहे. अशा गावाने वेगवेगळे उपक्रम राबविणे गौरवास्पद बाब आहे, असे प्रतिपादन होडावडे ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष मोहन नाईक यांनी होडावडे गावातील रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे आयोजित केलेल्या होडावडे नाट्यमहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
होडावडे येथील रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे होडावडे जिल्हा परिषद केंद्रशाळा क्र. १ च्या भव्य पटांगणावर होडावडे पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन ग्रामोन्नती मंडळ मुंबईचे अध्यक्ष मोहन गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर होडावडे सरपंच राजबा सावंत, होडावडे श्री देव क्षेत्रपालेश्वर पतपेढी मुंबई अध्यक्ष विजय गावडे, वेंगुर्ले तालुका काँगे्रस अध्यक्ष मनीष दळवी, होडावडे ग्रामोन्नती मंडळाचे खजिनदार उल्हास केरकर, होडावडे विकास सेवा सोसायटी अध्यक्ष मनोहर नाईक, सावंतवाडी रिक्षा संघटना अध्यक्ष भाऊ पाटील, रिक्षा संघटना जिल्हा पदाधिकारी सुधीर पराडकर, व्यापारी आनंद काजरेकर, सुरेश मेस्त्री, शाम पेडणेकर, पेंडूर सरपंच संतोष गावडे, होडावडे रिक्षा संघटना अध्यक्ष सुभाष दळवी, भास्कर साळगावकर, सप्तरंग कलामंच उमेश पावणोजी, रामचंद्र कुडाळकर, रिक्षा संघटना सचिव प्रसाद परब व अन्य मान्यवर उपस्थित होते.
होडावडे गावातील रिक्षा संघटनेचा विचार करता, ही संघटना नव्याने सामाजिक उपक्रम राबविण्यात उभारी घेत आहे. याबाबत उपस्थितांनी संघटनेचे कौतुक केले. दीपावली उत्सवानंतर होडावडे दशावतार नाट्यमहोत्सवाचे आयोजन मंडळाने केले आहे. या नाट्यमहोत्सवात होडावडे गावातील सप्तरंग कलामंचच्या कलाकारांनी सादर केलेला श्री स्वामी समर्थ दिंडी देखावा सर्वांच्या आकर्षणाचा विषय
ठरला. होडावडे बाजारपेठेतून सुरू करण्यात आलेल्या या देखाव्याचा समारोप महोत्सवस्थळी करण्यात आला. या चित्ररथात मान्यवरांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
रिक्षा संघटनेचे कौतुक
होडावडे गावात रिक्षा संघटनेने हा आगळावेगळा उपक्रम राबवून स्थानिक दशावतार कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले. रिक्षा संघटेनेचे पदाधिकारी आणि सदस्य मिळून केवळ १४ जणांनी एकत्र येऊन महोत्सवाचे यशस्वीपणे आयोजन केले. यात रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सुभाष दळवी, सचिव प्रसाद परब, उपाध्यक्ष किशोर होडावडेकर, राजन केळूसकर, सचिन कोंडये, हनुमंत आमडोसकर, प्रमोद दळवी, मोहन दळवी, संतोष गोसावी, गोट्या पेडणेकर, विजय होडावडेकर, विद्याधर दळवी यांनी विशेष परिश्रम घेतले.