लोककलेच्या अभ्यासकांसमोर उलगडला पोवाड्याचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:29 AM2021-05-25T04:29:17+5:302021-05-25T04:29:17+5:30

मुंबई विद्यापीठाच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासनामार्फत घेण्यात आलेल्या या ऑनलाईन कार्यशाळेत पोवाड्याचा आकृतिबंध या विषयावर कोल्हापुरातील शिवशाहीर ...

The history of Powada unfolded before the scholars of folk art | लोककलेच्या अभ्यासकांसमोर उलगडला पोवाड्याचा इतिहास

लोककलेच्या अभ्यासकांसमोर उलगडला पोवाड्याचा इतिहास

Next

मुंबई विद्यापीठाच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासनामार्फत घेण्यात आलेल्या या ऑनलाईन कार्यशाळेत पोवाड्याचा आकृतिबंध या विषयावर कोल्हापुरातील शिवशाहीर राजू राऊत यांनी मार्गदर्शन केले. राऊत हे शाहिरीचे अभ्यासक असून, या विषयातील डॉक्टरेट त्यांनी संपादन केलेली आहे.

सुमारे दोन तास रंगलेल्या या व्याख्यानात राऊत यांनी अकराव्या शतकातील शाहिरीपासून वर्तमानातील शाहिरीपर्यंतचा रंजक प्रवास पोवाड्यांच्या सादरीकरणासह सांगितला. शाहिरीचा जागतिक प्रवास, त्याचे विविध प्रकार याची माहिती राऊत यांनी विविध कवने इतिहासाचे दाखले देत मांडल्यामुळे या कार्यशाळेतील हे सत्र उद्बोधक आणि प्रवाही झाले होते. या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये राज्यातील लोककलेचे अभ्यासक सहभागी झाले होते.

शिवकाळातील शाहिरी, ब्रिटिश काळातील शाहिरी, शाहू काळातील शाहिरीपासून वर्तमान काळातील सामाजिक विषयांची मांडणी करणारी परिवर्तनवादी, प्रबोधनात्मक शाहिरीपर्यंतचा मोठा कालखंड राऊत यांनी ओघवत्या भाषेत मांडला.

------------------------------------------------------------------

फोटो : २४०५२०२१--कोल-राजू राउत

24052021-kol-raju rraut.jpg

(बातमीदार : संदीप आडनाईक)

Web Title: The history of Powada unfolded before the scholars of folk art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.