कागलमध्ये लोकसभेसह विधानसभेलाही इतिहास घडेल: संजय मंडलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:35 AM2019-04-06T00:35:28+5:302019-04-06T00:35:34+5:30

कागल : आमचे विरोधी उमेदवार धनंजय महाडिक यांना जिल्ह्यातील जनतेची जनभावना काय आहे, हे लक्षात आलेले नाही. म्हणून कै. ...

History will be held in Kagal with Loksabha: Sanjay Mandalik | कागलमध्ये लोकसभेसह विधानसभेलाही इतिहास घडेल: संजय मंडलिक

कागलमध्ये लोकसभेसह विधानसभेलाही इतिहास घडेल: संजय मंडलिक

Next

कागल : आमचे विरोधी उमेदवार धनंजय महाडिक यांना जिल्ह्यातील जनतेची जनभावना काय आहे, हे लक्षात आलेले नाही. म्हणून कै. सदाशिवराव मंडलिकांनी काय काम केले असे ते विचारित आहेत. कागल तालुक्यातील जनता नवा इतिहास घडविण्यासाठी सज्ज झाली आहे. समरजित घाटगे, संजयबाबा आणि आमची ही महायुती लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकीतही इतिहास घडविणार आहे, असे प्रतिपादन भाजप-शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी केले.
करनूर (ता. कागल) येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच लक्ष्मण भंडारी होते. करनूर, वंदूर, लिंगनूर दुमाला या गावांतील तिन्ही गटांचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रा. मंडलिक म्हणाले की, मी दहाला उठतो, सातला गायब होतो, अशी खालच्या पातळीवर टीका करणारे महाडिक पाच वर्षे काय केले हे मात्र बोलत नाहीत. ही निवडणूक जनतेनेच हाती घेतली आहे. यावेळी पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे म्हणाले, जिल्ह्याचा विकास होण्यासाठी भाजप-सेनेचा उमेदवार निवडून दिला पाहिजे. सदाशिवराव मंडलिक यांचा वारसा पुढे नेण्यासाठी संजय मंडलिकांना साथ दिली पाहिजे.
यावेळी माजी आमदार संजय घाटगे, शिक्षण सभापती अमरीश घाटगे, संभाजीराव भोकरे, युवा सेनेचे हर्षल सुर्वे, मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, अ‍ॅड. नीता मगदूम, अशोक शिरोळे, विलास चव्हाण यांचीही भाषणे झाली. स्वागत, प्रास्ताविक सचिन घोरपडे यांनी, सूत्रसंचालन तानाजी जाधव यांनी, तर आभार बाळासाहेब पाटील यांनी मानले.

Web Title: History will be held in Kagal with Loksabha: Sanjay Mandalik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.