भंडाऱ्याची उधळण, जयजयकारात मिरवणूक उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 01:40 PM2019-06-03T13:40:59+5:302019-06-03T13:43:04+5:30

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भंडाऱ्यांची उधळण, अखंड जयजयकार, पारंपरिक वाद्यांचा दणदणाट अशा उत्साही वातावरणात शहरातील प्रमुख मार्गावरून रविवारी मिरवणूक निघाली. गजनृत्य, धनगरी ढोलवादन पथक या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. धनगर महासंघ, धनगर समाज युवक संघटना, मल्हार सेनेतर्फे मिरवणूक आयोजित केली होती.

The hoarding of the store, the procession in haste | भंडाऱ्याची उधळण, जयजयकारात मिरवणूक उत्साहात

कोल्हापुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त धनगर महासंघ, धनगर समाज युवक संघटना, मल्हार सेनेतर्फे आयोजित मिरवणूक उत्साहात निघाली. त्यात आबालवृद्ध समाजबांधव सहभागी झाले. (छाया : नसीर अत्तार)

googlenewsNext
ठळक मुद्देभंडाऱ्याची उधळण, जयजयकारात मिरवणूक उत्साहातपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती; आबालवृद्धांचा सहभाग

कोल्हापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भंडाऱ्यांची उधळण, अखंड जयजयकार, पारंपरिक वाद्यांचा दणदणाट अशा उत्साही वातावरणात शहरातील प्रमुख मार्गावरून रविवारी मिरवणूक निघाली. गजनृत्य, धनगरी ढोलवादन पथक या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. धनगर महासंघ, धनगर समाज युवक संघटना, मल्हार सेनेतर्फे मिरवणूक आयोजित केली होती.

आकर्षकपणे सजविलेल्या रथातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे पूजन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते झाल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास दसरा चौकातून मिरवणुकीचा प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी मल्हारसेना सरसेनापती बबनराव रानगे होते.

मिरवणुकीत आकर्षक सजविलेल्या रथापुढे धनगरी ढोल, बँडपथकाचा दणदणाट, समाजबांधवांकडून सुरू असलेली भंडाऱ्यांची उधळण आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या अखंड जयघोषात मिरवणूक पुढे सरकत राहिली. समाजातील आबालवृद्ध डोक्यावर टोपी, कपाळाला भंडारा लावून, गळ्यात स्कार्फ घालून सहभागी झाले होते. आईसाहेब महाराज चौक, बिंदू चौक, शिवाजी चौक, महानगरपालिका चौक, ‘सीपीआर’मार्गे आलेल्या मिरवणुकीचा दसरा चौकात समारोप झाला.

या मिरवणुकीत जिल्हा परिषद सदस्य राजेश पाटील, वसंतराव मुळीक, भगवान काटे, नगरसेवक मोहन सालपे, व्यंकाप्पा भोसले, प्रा. शहाजी कांबळे, अ‍ॅड. रणजित गावडे, प्रकाश पुजारी, बयाजी शेळके, राघू हजारे, किशोर घाटगे, छगन नांगरे, बाबूराव बोडके, लिंबाजी हजारे, आनंदा देशिंगे, शिवाजी कारंडे, कृष्णात धोत्रे, राजेश तांबवे, प्रभाकर पाटील, सुवर्णा रानगे, आक्काताई देशिंगे, इंदुमती हजारे, यशोदा हजारे, मनीषा हजारे, इचलकरंजीच्या नगरसेविका सुनीता शेळके, सोनाली अनुसे, बंडोपंत बरगाले, प्रल्हाद देबाजे, आदी सहभागी झाले.

चित्ररथातून इतिहासाचे दर्शन

या मिरवणुकीत चित्ररथ सहभागी करण्यात आला होता. त्याद्वारे होळकरशाहीची वैशिष्ट्ये आणि इतिहासाचे दर्शन घडले. त्यामध्ये सतीप्रथा रद्द करणे, प्रजेच्या कल्याणाचे निर्णय, शिक्षण प्रसार, कलकत्ता ते काशी रस्त्याची बांधणी, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उभारलेल्या पोलीस चौक्या, होळकर कॉलेजची उभारणी, आदींची माहिती देणाºया फलकांचा समावेश होता. हा चित्ररथ लक्षवेधक ठरला.

 

 

Web Title: The hoarding of the store, the procession in haste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.