पवार ट्रस्टतर्फे हॉकी प्रशिक्षक अनिकेत मोरे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:16 AM2021-07-04T04:16:52+5:302021-07-04T04:16:52+5:30
कोल्हापूर : केंद्र शासनाने नूल (ता. गडहिंग्लज) येथील इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नव्याने सुरू केलेल्या ‘मिनी खेलो इंडिया’ ...
कोल्हापूर : केंद्र शासनाने नूल (ता. गडहिंग्लज) येथील इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नव्याने सुरू केलेल्या ‘मिनी खेलो इंडिया’ सेंटरच्या हॉकी प्रशिक्षकपदी ‘एनआयएस’ प्रशिक्षित अनिकेत मोरे याची निवड झाली. त्याबद्दल त्यांचा हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्ट व राज प्रकाशनतर्फे त्याचा सत्कार करण्यात आला.
नूल येथे असणारे हे हॉकी प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव केंद्र आहे. मोरे यांचा सत्कार क्रीडाशिक्षक महेश सूर्यवंशी व अमित शिंत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक ट्रस्टचे संस्थापक प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांनी केले. आभार राजनंदिनी पवार यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला ज्ञानदेव खारगे, मंत्रालयातील कक्ष अधिकारी राजकुंवर डफळे-पवार, प्रा. दिग्विजय पवार आदी उपस्थित होते.
फोटो नं. ०३०७२०२१-कोल-पवार ट्रस्ट
ओळ : हौसाबाई पवार ट्रस्टतर्फे प्रशिक्षक अनिकेत मोरे यांचा क्रीडा शिक्षक महेश सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी ज्ञानदेव खारगे, अमित शिंत्रे, प्राचार्य डॉ. जे. के. पवार राजकुंवर डफळे आदी उपस्थित होते.
030721\03kol_1_03072021_5.jpg
ओळ : हौसाबाई पवार ट्रस्टतर्फे प्रशिक्षक अनिकेत मोरे यांचा क्रीडा शिक्षक महेश सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ज्ञानदेव खारगे, अमित शिंत्रे, प्राचार्य डॉ. जे. के. पवार राजकुंवर डफळे आदी उपस्थित होते.