गणेशोत्सवाला परवानगी न दिल्यास धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:27 AM2021-08-19T04:27:14+5:302021-08-19T04:27:14+5:30
मंगळवारी धर्मवीर संभाजी राजे चौक येथून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. येथील नगरपालिका कार्यालयाजवळ आल्यानंतर कार्यकर्त्यांनी ‘उत्सवाला परवानगी ...
मंगळवारी धर्मवीर संभाजी राजे चौक येथून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. येथील नगरपालिका कार्यालयाजवळ आल्यानंतर कार्यकर्त्यांनी ‘उत्सवाला परवानगी द्या अन्यथा खुर्च्या खाली करा,’ ‘गणेश उत्सव आमच्या हक्काचा’ यासह विविध घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
नगरसेवक विलास गाडीवड्डर म्हणाले की, कोरोनामुळे सरकारने सर्व मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यास निर्बंध घातले आहेत. त्यामुळे मूर्तिकार, मंडप डेकोरेटर्स, लाईट डेकोरेटर्स, वाजंत्री असे अनेक लहान-मोठे उद्योगधंदे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. निवडणुकीतील प्रचार व स्पीकर अशा गोष्टींना परवानगी दिली आहे. त्याच प्रमाणे गणेशोत्सव मंडळालासुद्धा परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, माजी सभापती सुनील पाटील, संजय सांगावकर डॉ. जसराज गिरे, दत्ता नाईक संजय पावले, माजी नगरसेवक दिलीप पठाडे, दीपक सावंत, श्री चव्हाण, सूरज राठोड, प्रतीक शहा, श्रेयस आंबले, बसवराज नाईक, यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो :
निपाणी : सार्वजनिक गणेश उत्सवाला परवानगी द्यावी, यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.