पूरपरिस्थितीच्या नियोजनासाठी दक्षता बैठक घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:21 AM2021-05-01T04:21:50+5:302021-05-01T04:21:50+5:30
कोल्हापूर : संभाव्य पूरपरिस्थितीच्या नियोजनासाठी व्यापक दक्षता बैठक आयोजित करावी, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी जिल्हाधिकारी दौलत ...
कोल्हापूर : संभाव्य पूरपरिस्थितीच्या नियोजनासाठी व्यापक दक्षता बैठक आयोजित करावी, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना केली आहे.
सन २०१९ चा अनुभव पाठीशी असल्यामुळे गेल्यावर्षी योग्यवेळी घेतलेली दक्षता व पूर्वनियोजन यामुळे पूरपरिस्थिती नियंत्रणात ठेवणे शक्य झाले होते. यावर्षीही चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे कोरोनाबरोबर संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेऊन संभाव्य पूरपरिस्थितीच्या पूर्वनियोजनासाठी त्वरित बैठक आयोजित करावी. या बैठकीसाठी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, खासदार संभाजीराजे, खासदार धैर्यशील माने, जिल्ह्यातील सर्व आमदार व सर्व संबंधीत विभागाचे अधिकारी यांना निमंत्रित करावे. यामुळे कोरोना व संभाव्य पूरस्थिती अशा दोन आपत्तींच्या आघाडीवर लढताना प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व नागरिकांची तारांबळ टाळता येणे शक्य आहे, असे मत आमदार जाधव यांनी व्यक्त केले आहे.