कुरुंदवाडमध्ये शेतकरीविरोधी कृषी कायद्याची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:15 AM2021-03-30T04:15:45+5:302021-03-30T04:15:45+5:30
कुरुंदवाड : येथील राष्ट्रसेवा दल व क्रांती ग्रुप यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा समन्वय समिती आणि जनआंदोलनाची संघर्ष ...
कुरुंदवाड : येथील राष्ट्रसेवा दल व क्रांती ग्रुप यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा समन्वय समिती आणि जनआंदोलनाची संघर्ष समिती कोल्हापूर यांच्यावतीने होळीनिमित्त केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कृषी कायदा मागे घ्यावा, या मागणीसाठी कुरुंदवाड व हेरवाड (ता. शिरोळ) या दोन ठिकाणी केंद्र सरकारच्या निषेधार्थ होळीचे आयोजन केले होते.
या आंदोलनात राष्ट्र सेवादलाचे महामंत्री बाबासाहेब नदाफ, शिवाजीराव रोडे, सच्चिदानंद आवटी, बंडू उमडाळे , संतोष जुगळे, महेश घोटणें, सदानंद आलासे, आनंदा बरगाले, जमीर मुल्ला, बापू बानदार, डी. एम. चव्हाण, मधुकर राणे, पुंडलिक अपराज यासह शेतकरी सहभागी झाले होते.
फोटो - २९०३२०२१-जेएवाय-०८
फोटो ओळ - भारतीय किसान समन्वय समितीच्यावतीने कुरुंदवाड येथे केंद्र सरकारच्या विरोधात कृषी कायद्याच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.