गंगावेशेत चिनी साहित्याची होळी, उत्तरेश्वर पेठेतील नागरिक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 06:53 PM2020-06-20T18:53:52+5:302020-06-20T18:55:07+5:30
उत्तरेश्वर पेठ राष्ट्रप्रेमी नागरिकांनी चिनी राष्ट्राध्यक्षांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. गंगावेश चौकात चिनी वस्तू जाळून भारतीय जवानांवरील हल्ल्याचा निषेध केला. शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कोल्हापूर : उत्तरेश्वर पेठ राष्ट्रप्रेमी नागरिकांनी चिनी राष्ट्राध्यक्षांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. गंगावेश चौकात चिनी वस्तू जाळून भारतीय जवानांवरील हल्ल्याचा निषेध केला. शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
उत्तरेश्वर पेठेतील नागरिकांनी शुक्रवार गेटपासून चीनचे राष्ट्राध्यक्ष यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा सुरू केली. यावेळी परिसरातील नागरिकांनी चिनी बनावटीचे टी.व्ही., मोबाईल, फॅन, खेळणी, इलेक्ट्रिक वस्तू, लाईटच्या माळा घेऊन सहभागी झाले.
गंगावेश चौकात अंत्ययात्रा आल्यानंतर चिनी साहित्य जाळण्यात आले. जला दो, जला दो, चीन को जला दो, चिनी ड्रॅगन मुर्दाबाद, चीन हाय, चीन हाय अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी किशोर घाटगे, उदय प्रभावळे, राजेंद्र शिंदे, सुरेश कदम, स्वप्निल सावंत, युवराज जाधव, अरुण पाटील, रोहन गवळी, महेश अणावकर, आदी उपस्थित होते.