होळी पौर्णिमा : सामाजिक संस्थेतर्फे पंचगंगा स्मशानभूमीस शेणी दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 01:43 PM2019-03-21T13:43:07+5:302019-03-21T13:45:19+5:30

‘होळी करा लहान, पोळी करा दान, शेणी करा स्मशानभूमीस दान’ असे आवाहन करत मंगळवारी शहरातील काही सामाजिक संस्थांनी महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीस शेणी दान करून विधायक उपक्रमाची जोड दिली. याशिवाय पुढील दोन दिवसांत मोठ्या संख्येने विविध संस्थांतर्फे शेणी दान करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.

Holi Purnima: Sanyani donation by Panchayatan Sambhaapthan to the social organization | होळी पौर्णिमा : सामाजिक संस्थेतर्फे पंचगंगा स्मशानभूमीस शेणी दान

होळी पौर्णिमेमध्ये ‘होळी लहान करा’ उपक्रमांतर्गत फुलेवाडी येथील मानसिंग पाटीलप्रेमीतर्फे स्मशानभूमीस ‘शेणी दान’चा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी फुलेवाडी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देहोळी पौर्णिमा : सामाजिक संस्थेतर्फे पंचगंगा स्मशानभूमीस शेणी दानमानसिंग पाटील प्रेमीतर्फे ५१ हजार शेणी प्रदान

कोल्हापूर : ‘होळी करा लहान, पोळी करा दान, शेणी करा स्मशानभूमीस दान’ असे आवाहन करत मंगळवारी शहरातील काही सामाजिक संस्थांनी महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीस शेणी दान करून विधायक उपक्रमाची जोड दिली. याशिवाय पुढील दोन दिवसांत मोठ्या संख्येने विविध संस्थांतर्फे शेणी दान करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.

फुलेवाडी येथील मानसिंग पाटील प्रेमीच्यावतीने ५१ हजार शेणी पंचगंगा स्मशानभूमीस दान केल्या. हे शेणी दान करण्याचे यंदाचे तिसरे वर्षे होते. सकाळी फुलेवाडी दत्त मंदिर चौकात महापालिकेचे उपायुक्त मंगेश शिंदे यांच्या हस्ते शेणी भरलेल्या वाहनांचे पूजन करण्यात आले.

यावेळी मानसिंग पाटील, अ‍ॅड. सुरेश कांबळे, अ‍ॅड. सी. बी. कोरे, माजी नगरसेवक सर्जेराव पाटील, कृष्णात पाटील आदी उपस्थित होते. सुमारे १२ ट्रॅक्टर-ट्रॉली भरून या शेणी दुपारी पंचगंगा स्मशानभूमीमध्ये दान करण्यात आल्या.
याशिवाय सामाजिक कार्यकर्ते बाबूराव पागर यांनी सुमारे १५०० शेणी स्मशानभूमीस दान केल्या.

याशिवाय सानेगुरुजी वसाहत परिसरातील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव कमिटीच्यावतीने स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्यावतीने रविवारी (दि.२४) सुमारे पावणे दोन लाख शेणी पंचगंगा स्मशानभूमीस दान करण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी १ लाख, गेल्यावर्षी दीड लाख तर यंदाचे हे तिसरे वर्षे असल्याने पावणे दोन लाख शेणी दान करण्यात येणार आहेत.

महाद्वार रोडवरील वांगी बोळ येथील अचानक तरुण मंडळाच्यावतीने सलग नऊ वर्षे हा शेणी दानचा उपक्रम केला जात आहे. यंदाही त्यांच्यातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे ५१ हजार शेणी दान करण्यात येणार आहेत.

कचरा व्यवस्थापन जागृती करा

होळी करायची असेल तर रस्त्यावर नको, मैदानात पण प्रतीकात्मक करा, असे आवाहन निसर्ग मित्र संस्थेचे अनिल चौगुले यांनी करून या होळी सणाला विधायक उपक्रमाची जोड देण्यासाठी कचरा व्यवस्थापनबाबत जागृतीची मोहीम प्रत्येकाने हाती घ्यावी, असे आवाहन केले आहे.


 

 

Web Title: Holi Purnima: Sanyani donation by Panchayatan Sambhaapthan to the social organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.