शाळांना सुटीचा प्रस्ताव

By admin | Published: September 29, 2016 01:22 AM2016-09-29T01:22:09+5:302016-09-29T01:22:50+5:30

अभिजित तायशेटे : जिल्हा परिषदेच्या शाळांचा समावेश

Holidays offer to schools | शाळांना सुटीचा प्रस्ताव

शाळांना सुटीचा प्रस्ताव

Next


जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची रॅली
मराठा मोर्चात कागलकर सर्वाधिक असतील : घाटगे
ंमराठा मूक मोर्चासाठी रविवारी बावड्यात रॅली
म्हाकवे ग्रामस्थ मोर्चात सहभागी होणार
म्हाकवे : म्हाकवे (ता. कागल) येथील आजी-माजी सैनिक संघटनेसह ग्रामस्थांनी श्रीनगर येथील उरी सेक्टरमध्ये पाक पुरस्कृत भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. तसेच यामध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांसह ग्रामस्थांनी निर्णय घेतला.गावच्या मध्यवर्ती बसस्थानकावर सैनिक संघटनेच्यावतीने पाकच्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेध सभेचे आयोजन केले होते. यावेळी एस. बी. चौगुले, तुकाराम सोनबा पाटील, संघटनेचे अध्यक्ष जिवाजी पाटील, बी. के. पाटील, गुलाब मुल्ला, महावीर पाटील, आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी सरपंच भारत लोहार, उपसरपंच रमेश पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबूराव पाटील, हरिभाऊ माळी, आदी उपस्थित होते.
मोर्चाला परीट समाजाचा पाठिंबा
कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत कोल्हापुरात काढण्यात येणाऱ्या मोर्चाला कोल्हापूर जिल्हा परीट समाजातर्फे जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. परीट समाजाची एकोंडी (ता. कागल) येथे घेण्यात आलेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी दिली.
खाटिक समाजाचा मोर्चास पाठिंबा
कोल्हापूर : मराठा क्रांती मूक मोर्चास खाटिक समाजातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. खाटिक समाजातर्फे घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय झाला, अशी माहिती समाजाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्यभर मराठा समाज अत्यंत शांततेत मूकमोर्चा काढत आहे. लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे आमचा या मोर्चास पाठिंबा आहे. बैठकीस बाळासो जाधव, किरण कोतमीरे, मीना प्रभावळे, विजय कांबळे, संजय भोपळे, शैलेंद्र घोटणे, शिवाजी घोटणे, आदी उपस्थित होते.
लिंगायत धर्मसभेचा पाठिंबा
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुका लिंगायत धर्मसभेतर्फे मराठा समाज आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यात आला आहे. उद्या, शुक्रवारी गडहिंग्लज येथे काढण्यात येणारी मूक फेरी आणि १५ आॅक्टोबरला कोल्हापूर येथे होणाऱ्या मूक मोर्चात लिंगायत धर्मबांधव मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी माहिती लिंगायत धर्मसभेचे तालुकाध्यक्ष महेश आरभावी यांनी दिली.
हिंदू महासभेतर्फे मोर्चास पाठिंबा
कोल्हापूर : हिंदू महासभेतर्फे मराठा क्रांती मूक मोर्चाला पाठिंबा जाहीर करून यामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात आयोजित बैठकीत हा निर्णय झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष बापूसो यादव, शहराध्यक्ष मनोहर सोरप, सचिन पाटील, बबन हरणे, राजेश मेथे, राजेंद्र शिंदे, मारुती मिरजकर, प्रकाश सूर्यवंशी, संजय कुलकर्णी, रेखा दुधाणे, राजश्री चव्हाण, आदी उपस्थित होते.

Web Title: Holidays offer to schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.