भाविकांचे पवित्र स्रान...

By admin | Published: April 9, 2017 12:40 AM2017-04-09T00:40:44+5:302017-04-09T00:40:44+5:30

चंद्रपुरात सध्या चंद्रपूरचे आराध्य दैवत देवी महाकालीची यात्रा सुरू आहे.

Holy holy place ... | भाविकांचे पवित्र स्रान...

भाविकांचे पवित्र स्रान...

Next

 कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यात जिल्हा बॅँकेत बैठक झाली. राष्ट्रवादी कॉँग्रेसला सहा जागा देण्याचा प्रस्ताव कॉँग्रेसने ठेवला आहे; पण तो राष्ट्रवादीला मान्य नसल्याने आघाडीचे घोंगडे अजूनही भिजतच आहे.
गेले सहा-सात दिवस कारखाना बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वपक्षीय नेत्यांच्या दोन बैठका झाल्या. शनिवारी तिसऱ्यांदा कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, शिवसेना, भाजप, स्वाभिमानी, जनता दल यासह इतर पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली; पण चर्चेतून काहीही निष्पन्न होत नसल्याने प्रत्येकाने आपापला मार्ग निवडावा, असा निर्णय घेण्यात आला.
त्यानंतर दोन्ही कॉँग्रेसने एकत्रित येण्याच्या प्रक्रियेने गती घेतली. त्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ व पी. एन. पाटील यांची जिल्हा बॅँकेत बैठक झाली. कारखान्यासह आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे आव्हान परतवून लावायचे झाल्यास दोन्ही कॉँग्रेसने एकत्रित येणे गरजेचे आहे.
त्याची सुरुवात कारखाना निवडणुकीपासून करूया, असा प्रस्ताव राष्ट्रवादीने ठेवल्याचे समजते. दोघांनी एकत्र येण्याची तयारी दर्शविली, पण जागा वाटपाचा तिढा कायम राहिला आहे. राष्ट्रवादीला सहा जागा देऊन १३ जागा कॉँग्रेसकडे ठेवण्याचा प्रस्ताव पी. एन. पाटील यांनी ठेवला आहे. दोन जागा ‘स्वाभिमानी’ व जनता दलासाठी त्यांनी राखीव ठेवल्याची चर्चा आहे. सहा जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादीने अमान्य केला असून, कारखान्याची सत्ता राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे किमान अकरा जागा मिळाल्या पाहिजेत, असा आग्रह राष्ट्रवादीचा आहे. त्यामुळे दोन्ही कॉँग्रेसचे घोडे सहा आणि अकरा वरून पुढे-मागे सरकणार का? यावरच आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे. याबाबत उत्सुकता ताणली असून याबाबत आज, रविवारी आणखी राजकीय हालचाली मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.


दोन्ही कॉँग्रेस आघाडीची अफवा
‘भोगावती’ निवडणुकीबाबत करवीर व राधानगरी तालुक्यांत कमालीची उत्सुकता आहे. शनिवारी दुपारी हसन मुश्रीफ व पी. एन. पाटील यांच्यात झालेली बैठक व आघाडी झाल्याची बातमी दोन्ही तालुक्यांत वाऱ्यासारखी पसरली. याबाबतची खात्री करण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे दिवसभर विचारणा होत होती.



आघाडीचा आज फैसला
सोमवारी माघारीचा शेवटचा दिवस असल्याने आघाडीबाबत ज्या काही चर्चा करायच्या त्या आज, रविवारीच होणार आहेत. त्यामुळे आघाडीचा फैसला आजच होणार आहे.
कॉँग्रेस व राष्ट्रवादी एकत्रित यावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. बैठकीत सांगोपांग चर्चा झाली; पण जागा वाटपावर काही अडचणी आहेत. यातून काहीतरी मार्ग निघेल आणि आघाडी होईल, अशी आशा आहे.
- आमदार हसन मुश्रीफ

हसन मुश्रीफ यांच्याबरोबर बैठक झाली. यामध्ये दोन्ही कॉँग्रेसने एकत्र यावे यावर चर्चा झाली. प्रस्ताव कोणी कोणाला दिलेला नाही, केवळ चर्चा सुरू आहे.
- पी. एन. पाटील, जिल्हाध्यक्ष, कॉँग्रेस

Web Title: Holy holy place ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.