शिवराज्याभिषेकसाठी पाच ठिकाणांवरील पवित्र जल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:18 AM2021-06-04T04:18:30+5:302021-06-04T04:18:30+5:30
कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रविवारी रायगडाावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी कोल्हापूर हायकर्स फाउंडेशनच्यावतीने उत्तराखंड व महाराष्ट्रातील पाच ठिकाणांवरून पवित्र जल ...
कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रविवारी रायगडाावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी कोल्हापूर हायकर्स फाउंडेशनच्यावतीने उत्तराखंड व महाराष्ट्रातील पाच ठिकाणांवरून पवित्र जल आणण्यात आले आहे. हे जल अखिल भारतीय शिवराज्याभिषेक साेहळा समितीकडे सुपूर्द केल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष सागर पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या ६ जून या दिवशी आजही रायगडावर हा सोहळा होतो. या जलाभिषेकासाठी संस्थेच्यावतीने ट्रेकच्या माध्यमातून उत्तराखंडमधील तुंगनाथ येथील १२ हजार फुट उंचीवरील महादेव मंदिरातून पाणी आणले आहे. यासाठी १९ जणांची टीम तेथे गेली होती. तसेच महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई, गंगा नदी, पन्हाळा, लिंगाणा या पाच ठिकाणावरून पाणी आणण्यात आले आहे. सलग दुसऱ्यावर्षी कोरोनामुळे शिवभक्तांना या सोहळ्यासाठी जाता येणार नाही, त्यामुळे हे जल अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडे सुपूर्द करण्यात आले आहे. खासदार संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत असून त्यासाठी फाउंडेशनला कायमस्वरूपी जलाभिषेकाचे जल आणण्याचा मान देण्यात आला आहे.
या मोहिमेत अमर शिंदे, तेजश्री भस्मे, अक्षय पाटील, कश्मिरा सावंत, अजिंक्य पाटील, शंकर जाधव, अभी चव्हाण, योगेश सावंत, निनाद कुलकर्णी, शीतल कुलकर्णी, सायली सावंत, इशा जाधव, सविता घुगे, पवन घुगे, अमृत महाडिक, इंद्रजित मोरे, संघवी राजवर्धन, सचिन पाटील, विजय ससे, मुकूंद हावळ सहभागी झाले होते.
--