५० पेक्षा जास्त वयाचे होमगार्ड बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:29 AM2021-06-09T04:29:02+5:302021-06-09T04:29:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे पन्नास वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या होमगार्डना गेले दीड वर्ष बंदोबस्त, सेवेपासून अलिप्त ...

Homeguards over 50 unemployed | ५० पेक्षा जास्त वयाचे होमगार्ड बेरोजगार

५० पेक्षा जास्त वयाचे होमगार्ड बेरोजगार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे पन्नास वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या होमगार्डना गेले दीड वर्ष बंदोबस्त, सेवेपासून अलिप्त ठेवल्याने त्यांच्या रोजंदारीचा प्रश्न निर्माण झाला. बंदोबस्त केला तरच मानधन मिळते. अनेकजणांवर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी असल्याने त्यांना दुसरीकडे रोजंदारीची कामे करण्याची वेळ आली आहे.

पोलिसांना बंदोबस्तावेळी मदतनीस म्हणून होमगार्डची सेवा मानली जाते. वर्षातील किमान चार महिने बंदोबस्ताच्या ड्युटीची ग्वाही सरकारने दिली होती. जितके दिवस ड्युटी तितक्याच दिवसांचे मानधन. पण कोरोना आला व ४५ ते ५० वयाच्या होमगार्डची दीड वर्षात रोजीरोटीच काढून घेतली. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा? त्यामुळे अनेकांनी इतर रोजगाराचा मार्ग निवडला.

पन्नास टक्के होमगार्डचे लसीकरण पूर्ण

वैद्यकीय सेवेच्या ठिकाणी बंदोबस्तावरील पोलिसांना ‘फ्रंट लाईन’ म्हणून लसीकरण केले. पण होमगार्डना तालुकास्तरावर लसीकरण करून घेेण्याचे आवाहन वरिष्ठांनी केले. नोंदणीकृत एकूण होमगार्डपैकी सुमारे ८३६ जणांनी कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतला, तर ६०० हून अधिक होमागार्डनी दुसरा डोस घेतल्याची नोंद जिल्हा समादेशक कार्यालयात आहे.

जगायचे कसे?

फॉन्ड्रीत काम करतोय...

वयाची पन्नाशी ओलंडल्याने गेले दीड वर्ष बंदोबस्ताची ड्युटी दिली नाही. हाताला काम नाही म्हणून मानधन नाही. घर प्रपंच तर चालवायचा आहे. त्यामुळे सध्या मी एका फॉन्ड्रीत माती भरण्याचे काम करून कुटूंबाचा गाडा चालवत आहे. त्यामुळे होमगार्डच्या हाताला काम नाही दिले तरी किमान ५० टक्के मानधन तरी द्यावे... - शिवाजी पाटील, होमगार्ड, वरणगे पाडळी (ता. करवीर)

सिक्युरिटी गार्डची नोकरी करतेय...

वयोमर्यादेचे कारण सांगून बंदोबस्त दिला नाही. दोन मुलांची जबाबदारी माझ्यावर आहे. ड्युटी नसल्याने किती दिवस वाट पाहणार? अखेर कोविड सेंटरवर खासगी सिक्युरिटी गार्डची नोकरी करून घरखर्च भागवत आहे. ह्या वयात पोलिसांना कार्यालयात ड्युटी दिली जाते. तशी होमगार्डनाही ड्युटी द्यावी अगर शासनाने मदत द्यावी... आशाराणी पाटील, बांबवडे (ता. शाहुवाडी)

वरिष्ठांनी लक्ष घालावे...

दीड वर्ष पन्नास वर्षांवरील होमगार्डना बंदोबस्त नाही. त्यामुळे मानधन नाही. कुटुंब चालवण्यासाठी मिळेल ते काम करीत आहे. अनेक वर्षे होमगार्ड सेवा केल्यानंतरही असे दिवस येतील असे वाटले नव्हते. आर्थिक मदतीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे.

- दिलीप कोळी, कोल्हापूर

शासनाने मदत करावी...

गेली २३ वर्षे होमगार्डचा बंदोबस्त करूनही आज वयोमर्यादेनुसार आम्हांला बंदोबस्त दिला नाही. पण पोटाची खळगी कशी भरणार या विवंचनेतून मिळेल तो रोजगार करून कुटुंबाला हातभार लावत आहे. त्यासाठी आता शासनाने आर्थिक मदतीचा हातभार लावावा.

- नंदकुमार लोंढे, पट्टणकोडोली (ता. हातकणंगले)

कोट...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीने पन्नास वर्षांवरील होमगार्डना बंदोबस्ताची ड्युटी न देण्याचा निर्णय शासनानेच घेतला आहे. बंदोबस्त न दिल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती अडचणीची झाली, त्यांच्या मदतीसाठी मुख्यालयाशी चर्चा केली आहे.

- जयश्री गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक तथा प्र. जिल्हा समादेशक (गृहरक्षक)

- जिल्ह्यातील नोंदणीकृत होमगार्ड : १७९९

- महिला होमगार्ड : १९५

- ५० वर्षांवरील महिला : १७०

- सध्या बंदोबस्तात असलेले होमगार्ड : १०७३

Web Title: Homeguards over 50 unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.