तीन तोळे सोन्याचे दागिने प्रामाणिकपणे परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:23 AM2021-04-02T04:23:29+5:302021-04-02T04:23:29+5:30
विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेतील सोने तारण ठेवलेले तीन तोळ्यांचे दागिने सोडवून शिवाजी ज्ञानू बचाटे मंगळवारी (दि. २३ ...
विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेतील सोने तारण ठेवलेले तीन तोळ्यांचे दागिने सोडवून शिवाजी ज्ञानू बचाटे मंगळवारी (दि. २३ मार्च) दागिने घेऊन एसटीने तिट्टा मार्गे जात होते. तिकिटासाठी पैसे देताना त्यांची दागिन्यांची खाली पडलेली पुडी लक्षात आली नाही. त्यावेळी त्यांच्या बाजूला सावर्डे पाटणला जाणारे आनंदा दौलू शेंडगे हे मुरगूडचा मंगळवारचा बाजार करून गावी जात होते. त्याचवेळी त्यांच्या पिशवीतील बाजाराचे साहित्य पिशवीतून खाली पडले. त्यांनी साहित्य परत पिशवीत भरून घेतले. घरी आल्यानंतर त्यांच्या पत्नीने पिशवी पाहिली असता पुडीत दागिने असल्याचे लक्षात आले. शिक्षक असणाऱ्या त्यांच्या मुलाने पुडीचा कागद पाहिला. त्यावरून हे दागिने विश्वनाथराव पाटील मुरगूड बँकेतील असल्याचे कळले. शेंडगे पितापुत्रांनी सलग तीन दिवस बँकेत येऊन व्हॉइस चेअरमन वसंतराव शिंदे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वासराव चौगले यांच्याशी भेटून सापडलेल्या दागिन्यांची खातरजमा करून घेतली आणि चार अंगठ्या, टॉप्सचे जोड असे सुमारे १ लाख ३० हजार किमतीचे सोन्याचे दागिने शिवाजी बचाटे यांना प्रामाणिकपणे परत केले.
फोटो : ०१ मुरगूड सत्कार
ओळ:- सोन्याचे दागिने प्रामाणिकपणे परत करणाऱ्या आनंदा शेंडगे यांचा विश्वनाथराव पाटील मुरगूड बँकेमध्ये सत्कार करताना वसंतराव शिंदे, विश्वासराव चौगले व अन्य मान्यवर उपस्थित होते.