पद, प्रतिष्ठा आणि पैसा हेच हनिट्रॅपचे निकष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 03:29 PM2020-10-03T15:29:43+5:302020-10-03T15:32:10+5:30

पदावर असलेली आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली व्यक्तीच हनिट्रॅपच्या जाळ्यात अडकविण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे राज्यभरात घडलेल्या घटनांवरून पुढे आले आहे. अशा व्यक्तींना ब्लॅकमेल करून पैसे उकळणे सोपे जाते, असाही त्यामागील होरा आहे.

Honeytrap's criteria are position, prestige and money | पद, प्रतिष्ठा आणि पैसा हेच हनिट्रॅपचे निकष

पद, प्रतिष्ठा आणि पैसा हेच हनिट्रॅपचे निकष

googlenewsNext
ठळक मुद्देसगळा व्यवहार फेसबूकवर लैंगिक चॅटिंगमधून सावज जाळ्यात

कोल्हापूर : पदावर असलेली आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली व्यक्तीच हनिट्रॅपच्या जाळ्यात अडकविण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे राज्यभरात घडलेल्या घटनांवरून पुढे आले आहे. अशा व्यक्तींना ब्लॅकमेल करून पैसे उकळणे सोपे जाते, असाही त्यामागील होरा आहे.

अशाप्रकारच्या फसवणुकीपासून सावधानतेने बचावलेल्या काहींनी यासंदर्भातील अनुभव शेअर केले व त्याबद्दल सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. गेल्याच आठवड्यात साताऱ्यात एका प्रसिद्ध डॉक्टरला अशाच पद्धतीने जाळ्यात ओढून त्यांच्याकडे ६० लाखांची खंडणी मागण्याची घटना घडली आहे.

या महिला आपले सावज मुख्यत: फेसबुकवर शोधत असतात. एखाद्या व्यक्तीने पोस्ट शेअर केली की त्यावर लगेच प्रतिसाद देऊन त्या माध्यमातून ओळख करून घेतली जाते. प्रत्यक्ष फोनवरून बोलणे किंवा भेटीच्या माध्यमातून या महिला कधीच समोर येत नाहीत. जे काही असेल ते सोशल मीडियाच्या माध्यमातूनच संपर्क वाढविला जातो.

एकदा अंदाज आल्यानंतर मॅसेंजरवरून व्यक्तिगत चॅटिंग करत तुमची सगळी माहिती काढून घेतली जाते. हे चॅटिंगही अशा स्वरूपाचे असते की कोणतेही व्यक्ती त्याच्या मोहाला बळी पडते. सामान्यत: आपण पत्नी अथवा मैत्रिणीसोबतही ज्या प्रकारचे विषय कधीच फारसे बोलत नाही असे विषय बोलले जातात. व्यक्तीला या प्रकरणाच्या संभाषणाची भूक असते. असे काही दिवस झाल्यानंतर मग शेवटच्या टप्प्यात मला तुम्हाला पाहायची इच्छा आहे, असे सांगून कपडे उतरवण्यासाठी आग्रह धरला जातो.

व्हिडिओ कॉल करून तशा अवस्थेत मला तुम्हाला पाहायचे आहे, असे सांगितले जाते. एकदा असे केले की तुम्ही जाळ्यात अडकलाच म्हणून समजा. त्याच आधारे मग तुमच्याकडे पैशांची मागणी व ब्लॅकमेलिंग सुरू होते. संबंधित व्यक्ती वयाने जास्त असते. कोणत्या तरी संस्थेत पदावर काम करत असते. त्यामुळे अब्रूच्या भीतीने पैसे देऊन विषय मिटवून टाकण्याकडे कल असतो.

एकटी महिला अथवा पती-पत्नीकडून संगनमतानेही अशा प्रकारचे ब्लॅकमेलिंग केले जात आहे. कोल्हापुरातही काही दिवसांपूर्वी निगडी, पुणे परिसरातील महिलांकडून सतत फेसबुकवर वावर असणाऱ्या व्यक्तींना असे फोन आले आहेत. त्यांनी त्यातील धोका ओळखून वेळीच सावध झाल्यामुळे ते त्यांच्या ट्रॅपला बळी पडले नाहीत. सातारच्या घटनेनंतर त्यांना हे नेमके काय प्रकरण आहे याचा उलगडा आता झाला आहे.

Web Title: Honeytrap's criteria are position, prestige and money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.