जिल्हा परिषदेत ‘उत्कृष्टां’चा सन्मान

By Admin | Published: April 29, 2015 11:48 PM2015-04-29T23:48:50+5:302015-04-30T00:22:30+5:30

आरोग्य विभागाचे मानकरी : विविध पुरस्कार वितरण; जिल्ह्यातील ३६ ग्रामपंचायतींचाही केला गौरव

Honor of 'Excellent' in Zilla Parishad | जिल्हा परिषदेत ‘उत्कृष्टां’चा सन्मान

जिल्हा परिषदेत ‘उत्कृष्टां’चा सन्मान

googlenewsNext

कोल्हापूर : येथील जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांचा सन्मान बुधवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सर्वोत्कृष्ट ‘आशा’ स्वयंसेविका, गटप्रवर्तक, लेक वाचवा अभियानांतर्गत उत्कृष्ट ग्रामपंचायत, गुणवंत अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील अध्यक्षस्थानी होत्या. उपाध्यक्ष शशिकांत खोत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
सन्मानित केलेल्यांची नावे अशी : जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट गटप्रवर्तक पुरस्कार - दीपाली पाटील, जयश्री भोपळे, वैशाली माने. आशा स्वयंसेविका पुरस्कार - अनिता कांबळे, शोभा शिंगे. स्वयंसेविका नावीन्यपूर्ण पुरस्कार - छाया काटे, सविता चव्हाण. तालुकास्तरीय सर्वोत्कृष्ट ‘आशा’ स्वयंसेविका पुरस्कार - अंजुम मकानदार (उत्तूर), सुमन कांबळे (वाटंगी), राणी सावर्डेकर (मडिलगे), अनुराधा ढेरे (कडगाव), शशिकला जाधव (कोवाड), स्मिता हळदणकर (हेरे), सुधाताई कोरी (नूल), शिल्पा हुबळे (मुुंगूरवाडी), माधवी बोडके (निवडे), उषा वरेकर (गारिवडे), उज्ज्वला जडे (सावर्डे), ज्योती शेंडे (हुपरी), गीता हुजरे (मुडशिंगी), शैलजा पाटील (कणेरी), अर्चना राजिगरे (कापशी), शुभांगी हेगडे (कसबा सांगाव), सुषमा गायकवाड, अनिता गावडे (केखले), छाया चौगले (तारळे), सुनीता शिंदे (सरवडे), अंजली पडियार (बांबवडे), संगीता देशमुख (माण), संजीवनी खाडे (अब्दुललाट), रेहाना नदाफ (टाकळी).
प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरीय सर्वोत्कृष्ट ‘आशा’ स्वयंसेविका पुरस्कार - सुनीता रेडेकर (मलिग्रे), सुनीता सावर्डे (भादवण), सुनीता शिंत्रे (उत्तूर), दर्शना गोवेकर (वाटंगी), रेखा सुतार (कडगाव), शारदा कांबळे (मडिलगे), संगीता आसबे (मिणचे), नंदा बोट (पिंपळगाव), स्मिता कांबळे (पाटगाव), सरिता पाटील (कोवाड), संगीता शिवणगेकर (कानूर खुर्द), अक्षता गावडे (हेरे), दीपा गुडेकर (तुडिये), राजश्री गुरव (अडकूर), सुमन पाटील (कानडेवाडी), सत्यव्वा कुरुणकर (कडगाव), मंगल कोले (महागाव), मालिनी सांबरेकर (मुंगूरवाडी), सविता डोंगरे (नूल), माया कांबळे (निवडे), रंजना गवळी (गारिवडे), वनिता कांबळे (हुपरी), रेखा पोवार (हेर्ले), कमरून्निसा शेख (भादोले), विद्या ढेरे (पट्टणकोडोली), अनिता रावण (पुलाची शिरोली), निर्मला कांबळे (सावर्डे), नूतन गायकवाड (साजणी), लता पाटील (अंबप), सुनीता आळतेकर (आळते), गीता सव्वाशे (कापशी), गितोजली गायकवाड (पिंपळगाव बुद्रुक), आंबुताई पोवार (सिद्धनेर्ली), मनीषा पाटील (चिखली), मनीषा देवडकर (कसबा सांगाव), मीनाक्षी मगदूम (इस्पुर्ली), सुवर्णा शिवशरण (कणेरी), संगीता पाटील (शिरोली), सुरेखा परीट (मुडशिगी), वनिता साळवी (हसूर दुमाला), सरिता शिंदे (भुये), प्रगती कांबळे (सांगरूळ), शर्मिला काशीद (उचगाव), भारती ढाले (वडणगे), संगीता सुतार (बाजार भोगाव), छाया काळे (बोरपाडळे), राणी यादव (कळे), गीता कांबळे (कोतोली), स्वप्ना गायकवाड ( केखले), सविता घोरपडे (पडळ), सविता सुतार (धामोड), द्रौपदी कांबळे (ठिकपुर्ली), सुजाता वर्णे (राशिवडे), वर्षा पाटील (सरवडे), शीतल पाटील (वाळवे), उमा सुतार (तारळे), जयश्री सातपुते (बांबवडे), संगीता पाटील (करंजफेण), अनिता सुतार (माण), मुक्ता शेटे (मांजरे), विद्याराणी कुंभार (शित्तूर), रूपाली पाटील (भेडसगाव), माधुरी गायकवाड (निनाई), सविता पाटील (आंबा), स्मिता कांबळे (घालवाड), सुभद्रा पोतदार (दानोळी), वैशाली कांबळे (जयसिंगपूर), सुनीता चंदुरे (नृसिंहवाडी), सविता कांबळे (नांदणी), दीपाली कांबळे (अब्दुललाट), रेखा गवळी (टाकळी).
सीईओ सुभेदार, उपाध्यक्ष खोत यांची यावेळी भाषणे झाली. डॉ. आर. एस. आडकेकर यांनी प्रास्ताविक केले. सुधाराणी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. योगेश साळे यांनी आभार मानले.

छत्तीस ग्रामपंचायतींचा गौरव
लेक वाचवा कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जिल्ह्यातील ३६ ग्रामपंचायती, बारा आरोग्यसेविका, पुरुष शस्त्रक्रियेसाठी विशेष प्रयत्न केलेले आरोग्यसेवक यांना पुरस्कार देण्यात आले. डॉ. आनंदबाई जोशी पुरस्कार देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

Web Title: Honor of 'Excellent' in Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.