‘सक्षम’ संस्थेमार्फत सोनाली नवांगुळ यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:27 AM2021-09-24T04:27:46+5:302021-09-24T04:27:46+5:30
कोल्हापूर : अपंगत्वावर जिद्दीने मात करून साहित्य क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या येथील लेखिका सोनाली नवांगुळ यांचा ‘सक्षम’ संस्थेमार्फत पुस्तक, ...
कोल्हापूर : अपंगत्वावर जिद्दीने मात करून साहित्य क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या येथील लेखिका सोनाली नवांगुळ यांचा ‘सक्षम’ संस्थेमार्फत पुस्तक, मिठाई भेट देऊन सन्मान करण्यात आला.
सोनाली नवांगुळ यांनी अनुवादित केलेल्या ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या कादंबरीला साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार जाहीर झाला आहे. नवांगुळ या गेली १३ वर्षे ब्रेल लिपीतील ‘स्पर्शज्ञान’ या पाक्षिकाचे संपादन करत आहेत. तसेच पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.याशिवाय सक्षम आणि हेल्पर्स ऑफ दि हॅन्डीकॅप्ड या अपंगांच्या संस्थेशी संबंधित संस्थेशी त्या संबंधित आहेत.
त्यांच्या या कामाचा गौरव करण्यासाठी ‘सक्षम’ ( समदृष्टी क्षमता विकास एवं अनुसंधान मंडल) या संस्थेच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष गिरीश करडे, डॉ. शुभांगी खारकांडे, भक्ती करकरे, सारिका करडे, ॲड. अमोघ भागवत, भक्ती करकरे, डॉ. ध्रुव खारकांडे यांनी सोनाली नवांगुळ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी त्यांच्याशी अनेक विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा झाली. कोल्हापुरातील सामान्यातील सामान्य व्यक्तीलाही मला मिळालेल्या पुरस्काराचा आनंद झाल्याची प्रतिक्रिया यावेळी सोनाली यांनी व्यक्त केली आणि उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी सोनाली यांच्या आई आणि वडीलही उपस्थित होते.
-------------------
फोटो : 23092021-Kol-sonali satkar
फोटो ओळ : साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालेल्या सोनाली नवांगुळ यांचा ‘सक्षम’च्या कोल्हापूर शाखेमार्फत पुस्तक आणि मिठाई भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. शुभांगी खारकांडे, भक्ती करकरे, सारिका करडे, डॉ. ध्रुव खारकांडे आणि गिरीश करडे उपस्थित होते.
--------------------------------------
(संदीप आडनाईक)