शरद पवार यांच्यामुळेच महिलांना सन्मान : हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 12:12 PM2020-11-09T12:12:07+5:302020-11-09T12:13:38+5:30
ncp, Hasan Mushrif, kolhapur राजकारणात महिलांना निम्म्याहून अधिक जागांवर आरक्षण देऊन शरद पवार यांनी त्यांचा सन्मान केल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कोल्हापूर : राजकारणात महिलांना निम्म्याहून अधिक जागांवर आरक्षण देऊन शरद पवार यांनी त्यांचा सन्मान केल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर होत्या.
रूपाली चाकणकर म्हणाल्या, शरद पवार यांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास ठेवून पक्षीय संघटनांच्या बांधणीसाठी महाराष्ट्रभरच्या महिला भगिनी सरसावल्या आहेत. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रेरणेने रूपाली चाकणकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर महिला संघटन मजबूत होत आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हाही मागे राहणार नाही.
महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी केले. वृषाली पाटील यांनी आभार मानले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, प्रविता सालपे, जहिदा मुजावर, महेंद्र चव्हाण, आदी उपस्थित होते.