करवाढ नसलेला हुपरीचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:32 AM2021-02-27T04:32:58+5:302021-02-27T04:32:58+5:30

कर महसूल, महसुली अनुदान, नगरपालिका जागा भाडे, गाळा भाडे, फी, व्याज, बाजार कर आदी उत्पनापासून सुमारे २७ कोटी ५९ ...

Hooper's budget without taxes | करवाढ नसलेला हुपरीचा अर्थसंकल्प

करवाढ नसलेला हुपरीचा अर्थसंकल्प

Next

कर महसूल, महसुली अनुदान, नगरपालिका जागा भाडे, गाळा भाडे, फी, व्याज, बाजार कर आदी उत्पनापासून सुमारे २७ कोटी ५९ लाख ४३ हजार ६०० इतकी जमा. तसेच आस्थापना खर्च, प्रशासकीय खर्च, मालमत्तांची दुरुस्ती, महसुली अनुदान, अंशदान विकासकामासाठी खर्च व्याज व वित्त आकार आदी बाबींवर ३५ कोटी ६० लाख १७ हजार रुपये खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये ५ टक्के दिव्यांग निधी, ५ महिला व बालकल्याण निधी, ५ टक्के क्रीडा निधी व ५ टक्के आर्थिक दुर्बल घटक याबरोबरच नगर परिषद इमारत बांधकामाकरिता ५ कोटी ५० लाख रुपये इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. सूर्यतलाव सुशोभीकरणाकरिता ९३ लाख ५४ हजार, नवीन रस्ते बांधणीकरिता १ कोटी ७० लाख, घनकचरा व्यवस्थापनकरिता १ कोटी ५६ लाख, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे दलित वस्ती सुधारणेकरिता सुमारे २ कोटी ५ लाख रुपये, घरकुल बांधकामाकरिता कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन, रमाई घरकुल, वैयक्तिक शौचालय, अग्निशमन गाडी खरेदी, पाणीपुरवठा व आरोग्य, बांधकाम विभागाचे दैनंदिन कामाकाजाकारिता आवश्यक निधींची तरतूदही करण्यात आलेली आहे. सुमारे दोन तास सुरू असलेल्या या ऑनलाइन सभेत मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार, पक्ष प्रतोद रफीक मुल्ला, सुरज बेडगे, बाळासाहेब मुधाळे, सर्व सभापती व नगरसेवक यांच्यासह लेखापाल, सभा अधीक्षक, तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

Web Title: Hooper's budget without taxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.