जगण्याची उमेद - भाग ३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:27 AM2021-09-27T04:27:42+5:302021-09-27T04:27:42+5:30
वर्क फ्रॉम होम होऊ शकते. व्हिडीओ काॅलिंगने मीटिंग होऊ शकते, आॅनलाईन शिक्षण दिले जाऊ शकते. पण या सगळ्यातील कोरडेपणा ...
वर्क फ्रॉम होम होऊ शकते. व्हिडीओ काॅलिंगने मीटिंग होऊ शकते, आॅनलाईन शिक्षण दिले जाऊ शकते. पण या सगळ्यातील कोरडेपणा जाणवू लागला आहे अतिकार्यमग्न, अतिधनसंचय आपल्याला अंधत्व देत आहे का? डोळे उघडले तर दिसेल भौतिक सुख क्षणभंगूर आहे. स्वतःचा शोध घेतला पाहिजे. आपल्याला काय पाहिजे आहे. त्या मृगजळाच्या मागे किती धावायचे आणि कुठे थांबायचे हे ज्ञात असेल तर ठीक अन्यथा धाप लागून श्वास गुदमरून जाईल. पाचच लोकांत अंत्यसंस्कार आणि पंचवीस लोकांत लग्न करून झाली तरी सुखात आणि दु:खात आपल्या लोकांची साथ असणे आवश्यक आहे हे अधोरेखित झाले. आपण प्रत्येक गोष्टीला पर्याय शोधला पण अन्नाला पर्याय नाही. पैसा श्रीमंती देऊ शकतो पण पैशाने पोट भरत नाही. बँकेच्या तिजोरीत करोडो रुपये भरून ठेवलेले करोडपती श्वासाविना गुदमरून मेले आणि खेड्यातील लोकांनी कणगी भरून ठेवलेल्या धान्यावर दिवस काढले.
या खटपटीत कधीही न बघितलेल्या आणि भविष्यात उपयुक्त गोष्टी समोर आल्या. आपल्याला आप्तेष्टांशी दोन शब्द बोलायला वेळ नव्हता. आपण कामधंदा सोडून त्यांच्यासोबत बंद घरात कितीतरी दिवस राहिलो. शहरातील गर्दीचे दुष्परिणाम जाणवले आणि खेड्यातील जगण्याचा आनंद कळला. फायद्यावर आधारित नफेखोर बाजारू मानवी व्यवहारांपेक्षा जगा आणि जगू द्या याची अनुभूती आली. टाळूवरचं लोणी खाण्यापेक्षा हातातील खर्डाभाकरी वाटून खाण्यात समाधान मिळालं.
0000