आशा, गटप्रवर्तकांचा आजपासून राज्यव्यापी संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:32 AM2021-06-16T04:32:28+5:302021-06-16T04:32:28+5:30

जयसिंगपूर : आशा व गटप्रवर्तक यांच्या न्याय हक्कासाठी केलेल्या आंदोलनात त्यांच्यावर लावलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत. कोरोनाबाधित झाल्यावर खासगी ...

Hopefully, the group promoters will go on a statewide strike from today | आशा, गटप्रवर्तकांचा आजपासून राज्यव्यापी संप

आशा, गटप्रवर्तकांचा आजपासून राज्यव्यापी संप

Next

जयसिंगपूर : आशा व गटप्रवर्तक यांच्या न्याय हक्कासाठी केलेल्या आंदोलनात त्यांच्यावर लावलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत. कोरोनाबाधित झाल्यावर खासगी दवाखान्यातून उपचार घेतलेल्या आशा व गटप्रवर्तकांना त्यांच्या बिलाची रक्कम परत मिळावी. कोविडमध्ये काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तकांना राज्यात समान पद्धतीने भत्ता द्यावा, यांसह विविध मागण्यांप्रश्नी आज मंगळवारपासून कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्यावतीने राज्यव्यापी बेमुदत संप करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नेत्रदीपा पाटील यांनी दिली.

पत्रकात म्हटले आहे की, आशा व गटप्रवर्तकांना इतर आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे जोखीम भत्ता देण्यात यावा. कोविड लसीकरणांतर्गत शासकीय आदेशानुसार मोबदला देण्यात यावा. कोरोनाबाधित होऊन ज्या आशा व गटप्रवर्तकांच्या पतींचा मृत्यू झाला आहे, अशांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी. केंद्र व राज्य शासनाकडून मानधन दरमहा मिळावे. ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविडमध्ये काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तकांना समान पद्धतीने भत्ता देण्यात यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

या वेळी ज्योती तावरे, उज्ज्वला पाटील, माया पाटील, संगीता पाटील यांच्यासह आशा व गटप्रवर्तक उपस्थित होते.

Web Title: Hopefully, the group promoters will go on a statewide strike from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.