धामणी प्रकल्पाच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:25 AM2021-03-10T04:25:58+5:302021-03-10T04:25:58+5:30

म्हासुर्ली : जिल्हयातील राधानगरी, गगनबावडा व पन्हाळा तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या धामणी मध्यम ...

The hopes of the Dhamani project are dashed | धामणी प्रकल्पाच्या आशा पल्लवित

धामणी प्रकल्पाच्या आशा पल्लवित

googlenewsNext

म्हासुर्ली : जिल्हयातील राधानगरी, गगनबावडा व पन्हाळा तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या धामणी मध्यम प्रकल्पाकरिता मार्च अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये १०० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे धामणी प्रकल्पाचे काम सुरू होण्यातील एक अडसर दूर झाला असून "धामणी" च्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. आमदार प्रकाश आबिटकर,आमदार पी. एन. पाटील यांच्यासह धामणी खोरा विकास कृती समितीच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

धामणी मध्यम प्रकल्पाचे काम सुरू करण्याकरिता आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी शासनस्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रकल्पास ७८२ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता घेता आली. परंतु जुन्या ठेकेदाराचे देणे असल्यामुळे निविदा प्रसिद्ध करण्यास अडथळे निर्माण झाले होते. याबाबत ठेकेदार न्यायालयात गेल्यामुळे निविदा करणे अडचण निर्माण झाली होती. याकरिता जलसंपदा विभागाने न्यायालयामध्ये शासनाच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करत न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून ठेकेदाराचे जुने ५५ कोटी रुपये अदा करण्यात आले.

परंतु गेल्या वर्षभरामध्ये देशासह राज्यात कोरोनासदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सर्वच कामकाज ठप्प अवस्थेत असल्यामुळे कोणतीही विकासात्मक कामे होऊ शकली नाही. या सर्वांचा कळत-नकळत फटका धामणी प्रकल्पाचे काम सुरू करण्यासही बसला. नोव्हेंबरपासून राज्यातील लॉकडाऊन उठल्यामुळे बहुतांशी कामे सुरू झाली आहे. धामणी प्रकल्पास निधी देण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आमदार आबिटकर यांनी आग्रही मागणी केली होती. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांनी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये धामणी प्रकल्पास भरीव निधीची तरतूद करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज विधानसभेमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये धामणी मध्यम प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्यामुळे गेल्या कित्येक वर्षांचा प्रश्न निकाली लागण्यास मदत होणार आहे. त्याबरोबरच प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध करण्याची प्रक्रियाही अंतिम टप्प्यामध्ये असून, याबाबत जलपंदा विभागाचे मुख्य अभियंता यांचेकडेही याबाबत सतत पाठपुरावा सुरू असून, लवकरच प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध होऊन धामणी प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.

याबरोबरच या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दुधगंगा आंतरराज्य प्रकल्पाकरिता ४० कोटी, सर्फनाला प्रकल्प ३० कोटी, नागणवाडी ल. पा. प्रकल्पाकरिता १० कोटी, उचंगी प्रकल्प १० कोटी, आंबेआहोळ प्रकल्प १०.१० कोटी इतकी भरीव तदतूद करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील निधीअभावी बंद अवस्थेत असेलेल्या सिंचन प्रकल्पांना महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये पूर्णत्वाकडे जाण्यास मदत होणार असून, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना भरीव निधीची तरतूद केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अर्थमंत्री अजितदादा पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे कोल्हापूरवासीयांच्या वतीने आभार व्यक्त केले.

आमच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून, येत्या काही दिवसांत फेरनिविदा प्रसिद्ध होऊन त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे धामणी खोरा सुजलाम-सुफलाम होऊन धामणीवासीयांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

आमदार प्रकाश आबिटकर

फोटो कॅप्शन ०९ धामणी धरणाचे चे संग्रहित छायाचित्र

Web Title: The hopes of the Dhamani project are dashed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.