भुदरगड पंचायत समितीचे वरातीमागून घोडे

By admin | Published: October 14, 2015 11:50 PM2015-10-14T23:50:44+5:302015-10-15T00:45:14+5:30

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे ‘कागदी घोडे’ : पावसाळा संपल्यावर भूजल पातळी वाढविण्याचा प्रयत्न

Horse horses after the publication of the Bhudargarh Panchayat Samiti | भुदरगड पंचायत समितीचे वरातीमागून घोडे

भुदरगड पंचायत समितीचे वरातीमागून घोडे

Next

शिवाजी सावंत -- गारगोर्टी---पावसाळा संपल्यानंतर भूजल पातळी वाढविण्याकरिता उपाययोजना करणे म्हणजे, ‘बैल गेला आणि झोपा केला’ असा कारभार पंचायत समितीचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग करीत असून, केवळ कागदी घोडे नाचवून प्रत्यक्ष काम करण्याऐवजी काम करण्याचा देखावा करीत असल्याचे त्यांच्या कृतीतून स्पष्ट होत आहे. खेड्या-पाड्यांतील लोकांना पिण्याचे पाणी व्यवस्थित मिळावे म्हणून शासनाने पंचायत समितीकडे स्वतंत्र पाणीपुरवठा विभाग निर्माण केला. या विभागाची जबाबदारी आहे की, लोकांना पुरेसे पाणी उपल्बधीच्या दृष्टीने उपाय योजना करणे. लोकांना आणि शासन दरबारी
त्याचा अहवाल पाठवून नियोजन करणे; पण अलीकडच्या काळात या विभागातर्फे अनेक पेयजल योजना करण्यात आल्या. यातील काही ठरावीक योजना वगळता बहुतांशी योजनांचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. याबाबत अनेक स्थानिकांच्या तक्रारी असतात; पण या शंकांचे निरसन कसे करायचे याबाबतीत हा विभाग कमालीचा तरबेज झाला आहे. भुदरगड तालुक्याला पाटगाव, चिकोत्रा, फये, कोंडुशी, मेघोली या धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. यासर्व जलाशयांची क्षमता एकत्रितरीत्या सात टी.एम. सी. होते. पण, चिकोत्रा धरण बांधल्यापासून केवळ एकदाच भरले आहे. आजअखेर हे धरण निम्मेच भरते.
यंदातर हे धरण केवळ ४० टक्के भरले आहे. तालुक्यात सरासरी २००० मि. मी. पाऊस पडतो. पूर्व भागात कमी पडतो, तर पश्चिम भागात तीव्र स्वरूपात पडतो. पाटगाव, फये, कोंडुशी, मेघोली ही धरणे भरून साधारणत: ४ ते ५ टी.एम.सी. पाणी नदी, नाल्यांतून वाहून जाते. मात्त, येथे नियोजनाचा अभाव असल्याने या अमूल्य साधनसंपत्तीकडे कोणाचेही लक्ष नाही. म्हणून दुष्काळाची स्थिती निर्माण झाली की ‘माकडाच्या घराच्या’ गोष्टीची आठवण होते. नदीकाठालगतची गावे वगळता इतर सर्व गावे पिढ्यान्पिढ्या या नैसर्गिक जलस्त्रोतावर अवलंबून आहेत. आजअखेर या स्त्रोत्रातून केवळ उपसा केला गेला. जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असताना आणि याची इंत्यभूत तांत्रिक माहिती पाणीपुरवठा विभागाला असताना केवळ यंदा पाऊस कमी पडल्याने आढावा बैठक घेऊन उपाययोजनांवर चर्चेचे गुऱ्हाळ करीत आहेत. तालुक्यातील देवकेवाडा, बेडीव पैकी धनगरवाडी, फये, धनगरवाडा, पळशिवणे, ढाणेवाडी ही गावे तीव्र टंचाईग्रस्त आहेत. पण, या गावांतील झरे कदाचित अथवा विहिरींचे पावसाळ्यात पुनर्भरण झाले असते, तर कदाचित १५८ वाडी, वस्त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागली नसती. नियोजनशुन्य कारभार आणि बेफिकीरपणा यामुळे ही गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार आहेत. यंदा टँकरने काही गावांना पाणीपुरवठा करावा लागणार आहे. निसर्गाने पाण्याचा खजिना दिला आहे. त्याची योग्य आणि नियोजनपूर्वक हाताळणी केल्यास एकही गाव टंचाईग्रस्त राहणार नाही.


७२ गावांना नदीतून पाणीपुरवठा
तालुक्यात दोनशे तीस वाड्या-वस्त्या आहेत. या वाड्या-वस्त्यांमध्ये एक लाख पन्नास हजार तिनशे लोक राहतात.
या सर्वांना पाणीपुरवठा ७२ जॅकवेल, २९ पाणीपुरवठा विहिरी, ११० झरे, ८६ हातपंप, ०२ दुहेरी पंप, २८ विद्युत पंप, 0४ खासगी विहिरी, अशा ३३१ साधनांद्वारे केला जातो.
यातील ७२ गावांना जवळपास नदीतून पाणीपुरवठा होतो.
उर्वरित १५८ वाडी-वस्त्यांना झरे, विहिरी, आणि हातपंपावर अवलंबून राहावे लागते.

Web Title: Horse horses after the publication of the Bhudargarh Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.