घोडेबाजाराला लगाम लागणार जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:28 AM2021-09-24T04:28:08+5:302021-09-24T04:28:08+5:30
नगरपालिका हद्दीत ३१ प्रभाग असून, प्रत्येक प्रभागात २ प्रमाणे ६२ नगरसेवक आहेत. आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, ...
नगरपालिका हद्दीत ३१ प्रभाग असून, प्रत्येक प्रभागात २ प्रमाणे ६२ नगरसेवक आहेत. आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांची संयुक्त सत्ता आहे. सत्ताधारी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
मलकापुरात जनसुराज्य भाजपची सत्ता मलकापूर नगरपालिकेवर जनसुराज्य-भाजप युतीची सत्ता आहे. पालिकेत भाजप ५, जनसुराज्य ४, शिवसेना ६, राष्ट्रवादी दोन असे राजकीय बलाबल आहे. पालिकेची निवडणूक दोन उमेदवारांचा एक प्रभाग अशीच झाली होती. या वेळीही एका प्रभागात दोन उमेदवार राहतील. ५५० ते ६०० मतांचा प्रभाग राहील.
पन्हाळ्यात ३००० मतदारांचा प्रभाग
पन्हाळा नगरपालिकेची मुदत ३१ डिसेंबरला संपणार आहे. जनसुराज्य पक्षाची सत्ता आहे. आता सात प्रभागांत १४ सदस्य व एका प्रभागात तीन सदस्य अशी निवडणूक होईल. एका प्रभागात मतदार संख्या २७९६ ते सरासरी ३००० मतदार प्रत्येक प्रभागात असतील.
गडहिंग्लजला दोन नगरसेवक वाढणार
गडहिंग्लज नगरपालिकेवर जनता दलाची सत्ता आहे. निवडणुकीनंतर गडहिंग्लज शहराची हद्दवाढ झाली आहे; त्यामुळे मतदारसंख्या वाढल्याने दोन नगरसेवक वाढणार आहेत. गेल्या वेळी आठ प्रभागांत मिळून नगरसेवकांची संख्या १७, तर नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट झाली होती. यावेळी हद्दवाढीमुळे नव्या प्रभागाची भर पडली आहे. त्यामुळे ९ प्रभागांत मिळून नगरसेवकांची एकूण संख्या १९ होणार आहे.
पेठवडगाव नगरपालिकेत २४०० मतदारांचा प्रभाग
पेठवडगाव नगरपालिकेत सत्तारूढ युवक क्रांती आघाडीची सत्ता आहे. गेल्या वेळीसारखीच यावेळी निवडणूक होईल. प्रत्येकी सात प्रभागांतून दोन सदस्य असे १४, तर एका प्रभागातून तीन अशा एकूण १७ सदस्यांची निवड होईल. एक प्रभाग २२०० ते २४०० मतदारांचा तर त्रिसदस्यीय प्रभाग ४ हजार मतांचा होणार आहे.
कागलमध्ये एक सदस्यवाढीची शक्यता
कागल नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. या वेळीही १० प्रभाग आणि २० सदस्य अशीच सदस्यसंख्या राहण्याची शक्यता आहे. वाढीव लोकसंख्या आणि मतदार संख्या विचारात घेऊन एक सदस्य वाढण्याची शक्यता आहे. एक प्रभाग तीन सदस्यांचा असेल. एका प्रभागात दोन सदस्यांसाठी २२०० ते २४०० मतदार संख्या असेल.
जयसिंगपूर मतदारसंख्या वाढणार
जयसिंगपूर नगरपालिकेत सध्या राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांच्या शाहू आघाडीची सत्ता आहे. सत्ताधारी शाहू आघाडीकडे १३, तर विरोधी भाजप, स्वाभिमानी, शिवसेना पुरस्कृत ताराराणी आघाडीकडे ९ असे बलाबल आहे. लोकसंख्येच्या तुलनेत प्रभागातील मतदारांच्या संख्येत काहीशी वाढ होणार आहे. त्यानुसार एक प्रभाग २८०० ते ३००० मतदारांचा राहील.
मुरगुडात एका प्रभागात तीन सदस्य
मुरगूड नगरपालिकेत शिवसेना म्हणजेच मंडलिक गटाची सत्ता आहे. १४ नगरसेवक या गटाचे आहेत. विरोधात मुश्रीफ पाटील गटाचे तीन नगरसेवक आहेत. यावेळी निवडणुकीत पहिल्या १ ते ७ प्रभागांत प्रत्येकी दोन सदस्य असतील. शेवटच्या आठव्या प्रभागात तीन सदस्य निवडून येतील.
कुरुंदवाडमध्ये जैसे थे
कुरुंदवाड नगरपालिकेत सध्या कॉग्रेस, राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. यावेळी गेल्या वेळेप्रमाणचे निवडणूक होईल. प्रगाग, नगरसेवकांची संख्या जैसे थेच राहील. प्रभागाच्या मतदारसंख्येतही फारसा फरक पडणार नाही.
चौकट
नगरपालिकानिहाय नगरसेवक आणि कंसात प्रभागाची संख्या अशी : इचलकरंजी ६३ (३१), कुरुंदवाड १७ (८), जयसिंगपूर २४ (१२), पेठवडगाव १७ (८), गडहिंग्लज १९ (९), पन्हाळा १७ (८), मुरगूड १७ (८), कागल २० (१०), मलकापूर १७ (८).