हुपरीच्या नगराध्यक्षपती भाजपच्या जयश्री गाट, १६00 मतांनी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 01:12 PM2017-12-14T13:12:36+5:302017-12-14T13:26:47+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील नगरपालिकेसाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या जयश्री गाट १६00 मतांनी विजयी झाल्या. नगरसेवक पदासाठीच्या १८ जागांपैकी भाजपने ७, ताराराणी जिल्हा विकास आघाडीने ५, मनसे प्रणित अंबाबाई विकास आघाडीने २, शिवसेनेने २ तर अपक्ष शिवप्रतिष्ठान संघटनेने २ अशा जागा मिळविल्या.

Hoshii city president Jayashree Gat won by 1600 votes | हुपरीच्या नगराध्यक्षपती भाजपच्या जयश्री गाट, १६00 मतांनी विजयी

हुपरीच्या नगराध्यक्षपती भाजपच्या जयश्री गाट, १६00 मतांनी विजयी

Next
ठळक मुद्देनगरसेवक : भाजप ७, ताराराणि ५, मनसे २, अपक्ष (शिवप्रतिष्ठान) २प्रभाग ९ मध्ये आश्चर्यकारक निकाल, शिवप्रतिष्ठानच्या संदीप वाईंगडे, सपना नलवडे विजयी

कोल्हापूर/हुपरी : कोल्हापूर जिल्ह्यातीलन व निर्मित हुपरी (ता. हातकणंगले) येथील नगरपालिकेसाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या जयश्री गाट १६00 मतांनी विजयी झाल्या.

नगरसेवक पदासाठीच्या १८ जागांपैकी भाजपने ७, ताराराणी जिल्हा विकास आघाडीने ५, मनसे प्रणित अंबाबाई विकास आघाडीने २, शिवसेनेने २ तर अपक्ष शिवप्रतिष्ठान संघटनेने २ अशा जागा मिळविल्या.

प्रभाग ९ मध्ये आश्चर्यकारक निकाल लागला आहे. या प्रभागात एकाही राजकीय पक्षाला विजय मिळाला नाही. येथे शिवप्रतिष्ठानच्या संदीप वाईंगडे आणि सपना नलवडे यांनी विजय मिळविला.

दरम्यान भाजपला बहुमत मिळालेले नसल्यामुळे या नगरपालिकेत अपक्ष आणि इतर पक्षांची मदत भाजपला घ्यावी लागणार आहे. उपमहापौर पद कोणाला द्यायचे, यावर सत्तेचे गणित राहणार आहे.

नगराध्यपदाच्या उमेदवार जयश्री गाट यांना प्रभाग १,२ आणि ३ मध्ये २७५0 मते मिळाली. विमल जाधव यांना ५९0, सीमा जाधव यांना २0२७, गीतांजली पाटील यांना १४४६, दीपाली शिंदे यांना ३४ तर ३८ मते नोटासाठी मिळाल्या.


हुपरी नगरपालिकेतील प्रभागवार विजयी उमेदवार -

प्रभाग १ : गणेश वाईंगडे - ताराराणी आघाडी , अनिता मधाळे - भाजप

प्रभाग २ : सुरज बेडगे - ताराराणी आघाडी, रेवती पाटील - ताराराणी आघाडी

प्रभाग ३ : अमर गजरे - मनसे आघाडी , सुप्रिया पालकर - भाजप

प्रभाग ४ : दौलतराव पाटील - मनसे आघाडी, ऋतुजा गोंधळी - भाजप

प्रभाग ५ : भरत लठ्ठे - भाजप, शितल कांबळे - ताराराणी आघाडी

प्रभाग ६ : जयकुमार माळगे - भाजप, लक्ष्मी साळोखे - भाजप

प्रभाग - ७ : रफिक मुल्ला - भाजप, पूनम पाटील - शिवसेना

प्रभाग - ८ : पिंटू मुधाळे - शिवसेना, माया रावण - ताराराणी आघाडी

प्रभाग - ९ : संदीप वाईंगडे - अपक्ष, सपना नलवडे - अपक्ष (शिवप्रतिष्ठान)

नवनिर्मित हुपरी (ता. हातकणंगले) नगरपरिषदेच्या बुधवारी पार पडलेल्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शांततामय व उत्साही वातावरणात ८५.३७ टक्के मतदान झाले. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असलेले नगराध्यक्षपद व ९ प्रभागांतील १८ नगरसेवकपदांसाठी नशीब आजमावत असलेल्या १०० उमेदवारांच्या नशिबाचा बुधवारी मतदारांनी मतदानरूपी केलेला फैसला आज, गुरुवारी स्पष्ट झाला. कोल्हापूर जिल्ह्यात नगरपरिषदेची पहिलीच निवडणूक होत असल्याने या निकालाकडे रौप्यनगरीवासीयां-बरोबरच संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले .

 

Web Title: Hoshii city president Jayashree Gat won by 1600 votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.