डोंगराळ भागातील रूग्णांचे श्रद्धास्थान निवडे आरोग्य केंद

By admin | Published: March 2, 2016 11:08 PM2016-03-02T23:08:59+5:302016-03-03T00:04:18+5:30

केंद्रांतर्गत २२ गावांचा समावेश : कायापालट अभियान आरोग्य केंद्राचे रूपच पालटले; आरोग्याच्या दृष्टिकोनातून विविध सोयीसुविधा

Hospice Health Center | डोंगराळ भागातील रूग्णांचे श्रद्धास्थान निवडे आरोग्य केंद

डोंगराळ भागातील रूग्णांचे श्रद्धास्थान निवडे आरोग्य केंद

Next

चंद्रकांत पाटील ल्ल गगनबावडा
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांनी व्यापलेला डोंगरी भाग, दुर्गम मागास निसर्गरम्य परिसर या डोंगराळ भागात वसलेले आणि ग्रामीण रुग्णांच्या सोयींकरिता असलेले निवडे (ता. गगनबावडा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे ग्रामीण जनतेचा ‘आत्मा’च बनले आहे. निवडे आरोग्य केंद्र म्हणजे रुग्णांच्या गैरसोयीचे आगार, असे एकेकाळचे चित्र होते. मात्र, सन २०११-१२ मध्ये कायापालट अभियान सुरूझाले आणि आरोग्य केंद्राचे रूपच बदलले. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विविध सोयींनीयुक्त या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांच्या आरोग्यसेवेबरोबर मनोबल वाढविणारे एक श्रद्धास्थान बनले आहे.
१९८४ साली निवडे प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली. २२ गावांचा समावेश असलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात एकूण चार उपप्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यान्वित आहेत. सुमारे १९ हजार २४ इतकी लोकसंख्या या परिसरात आहे. सुरुवातीला हे रुग्णालय गावातील जोतिर्लिंग मंदिरात सुरू होते. सन २००२ साली डोंगराळ भागात भव्य इमारत बांधून येथे आरोग्य सुविधा सुरू करण्यात आल्या.
या इमारतीमध्ये बाह्यरुग्ण विभाग व अंतर्गत रुग्ण विभाग आहेत. वैद्यकीय अधिकारी कक्ष, फार्मासिस्ट कक्ष, मिटिंग हॉल, कार्यालय कक्ष, आरोग्य सहाय्यक स्त्री कक्ष, पुरुष कक्ष, स्क्वेअर रुम, तीन वॉर्ड, डिलिव्हरी रुम, शस्त्रक्रियागृह, धर्मशाळा, दहा कॉटचे वॉर्ड या अद्ययावत सुविधा चालू
आहेत. संपूर्ण आरोग्य केंद्रात २४ तास लाईट, पाणी उपलब्ध असते. शौचालयगृह, बाथरुम तसेच रुग्णांना अंघोळीसाठी सोलर
गरम पाण्याची सोय २४ तास उपलब्ध आहे. स्त्रियांना प्रसूतीनंतर मोफत आहार वाटप योजना आहे. मोफत वाहतुकीची सोय आहे.
सुसज्ज प्रयोगशाळा चाचणी मोफत केली जाते. उत्तम प्रकारचा रक्त तपासणी विभाग आहे. या विभागामार्फत एच. बी. शुगर, एच. आय.व्ही. तपासणी, रक्त गट तपासणी, कावीळ, टी. बी., लघवी तपासणी, गरोदर मातांची रक्त तपासणी या विभागामार्फत मोफत केली जाते.
केंद्रात महिन्याला नऊ हजार बाह्य रुग्णांची तपासणी केली जाते. तर ८० ते ९० रुग्ण आंतररुग्ण विभागात लाभ घेतात. महिन्याला १० ते १२ प्रसूती होतात. या आरोग्य केंद्रामार्फत २२ गावांतील पिण्याच्या पाण्याची तपासणी मोहीम वेळच्या वेळी केली जाते. पाण्याचे नमुने तपासले जातात.
उपकेंद्राद्वारे कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन आरोग्य लसीकरण मोहीम व सर्व्हे करण्याची मोहीम राबविली जाते. या आरोग्य केंद्रामार्फत शासनाच्या विविध आरोग्य योजना लोकांपर्यंत पोहोचविल्या जातात.
जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा व्यवस्था, लक्ष्मीचे पाऊल, कन्या वाचवा, कुटुंब नियोजन विमा योजना राबविल्या जातात. रुग्णालयात पाणी शुद्धिकरण उपकरणे बसविण्यात आली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक शाळेतील
विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी, जंतनाशक गोळ््यांचे वाटप, स्वच्छता, वजन करणे हा उपक्रम राबविला जातो.

Web Title: Hospice Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.