३१ मार्चपर्यंत रुग्णालय नोंदणी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:23 AM2021-02-13T04:23:29+5:302021-02-13T04:23:29+5:30
कोल्हापूर : शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी आपल्या रुग्णालयाचे नोंदणी, नूतनीकरण प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, अन्यथा त्यांच्यावर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली ...
कोल्हापूर : शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी आपल्या रुग्णालयाचे नोंदणी, नूतनीकरण प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, अन्यथा त्यांच्यावर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, असा इशारा महानगरपालिकेच्यावतीने देण्यात आला आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मुंबई शुश्रूषा गृह नोंदणी अधिनियम १९४९ अंतर्गत सर्व नोंदणीकृत, अनोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी महापालिकेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांनी अशी नोंदणी केली नाही अथवा नोंदणी व नूतनीकरण करण्यास अर्ज सादर केला नाही, अशा सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी तत्काळ आपला नोंदणी, नूतनीकरणाचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक सर्व कागदपत्रासहीत विहीत फी भरून कोल्हापूर महानगरपालिकेच्या www.kolhapurcorporation.gov.in या बेवसाईटद्वारे सादर करण्याचा आहे.
नूतनीकरणबाबतचा अर्ज ३१ मार्चपर्यंत महापालिकेस प्राप्त होईल याची दक्षता घ्यावी. जे रुग्णालय चालक उक्त मुदतीत अर्ज सादर करणार नाहीत अशा रुग्णालय चालकांवर मुंबई शुश्रूषा गृह नोंदणी अधिनियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आला आहे.