‘चेतना’ला जागेसह सुसज्ज वसतिगृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 11:59 PM2017-08-18T23:59:06+5:302017-08-18T23:59:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेली अनेक वर्षे जागेसाठी अधिकाºयांकडे हेलपाटे मारणाºया येथील चेतना अपंगमती विकास संस्थेच्या पदाधिकाºयांना मोठा दिलासा देणारा दिवस शुक्रवारी उजाडला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी दुपारी या संस्थेला भेट देत जागेसह सुसज्ज इमारत उभारण्याचा ‘शब्द’ दिला. मुलांसाठीच्या वसतिगृहाचा आराखडाही तातडीने तयार करण्याच्या सूचना संबंधितांना दिला.
संस्थेतील कामकाजाची पाहणी केल्यानंतर भारावून गेलेले पाटील म्हणाले, ‘चेतना’ गतिमंद मुलांच्या क्षेत्रात खूप चांगले काम करीत आहे. या संस्थेचे जागेसंबंधीचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवून या संस्थेच्या मुलांना लिफ्टसह मैत्रिपूर्ण असे वसतिगृह उभारण्यासाठी त्वरित आराखडा केला जाईल, तशा सूचनाही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या.
संस्थेचे संस्थापक पवन खेबूडकर यांनी यावेळी संस्थेविषयी माहिती दिली. ते म्हणाले, २७ वर्षे शेंडा पार्क येथील पाऊण एकर जागेवर संस्था कार्यरत आहे. ही जागा संस्थेने शासनाकडे मागितली आहे. या मागणीस अनुसरून पालकमंत्री पाटील यांनी या बैठकीत आढावा बैठक घेतली. शेंडा पार्क येथील जागेची मोजणी ६० टक्के पूर्ण झाली आहे. ती येत्या पंधरा दिवसांत पूर्ण करून त्याबाबतचे पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन तत्काळ सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच चेतना अपंगमती संस्था सध्या जी जागा वापरत आहे ती त्यांना शासनस्तरावर कायमस्वरूपी देण्यासाठी प्रयत्न करून भविष्यात निवासी वसतिगृह, मैदान, प्रशासकीय इमारत, वैद्यकीय थेरपी सेंटर, आदींसाठी संस्थेच्या रास्त गरजांचा विचार करून आवश्यक जागेचा प्रस्ताव महिन्याभरात सादर करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकाºयांना दिले.
या भेटीदरम्यान पालकमंत्र्यांनी संस्थेच्या इमारतीसह वर्कशॉपला भेट देऊन कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात येत असलेल्या गणेशमूर्ती, संस्थेतील विद्यार्थ्यांकडून बनविण्यात येत असलेले शालोपयोगी साहित्य, फाईल्स, दीपावलीसाठी तयार करण्यात आलेले गिफ्ट बॉक्स, चिमण्यांची घरटी याची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, संस्थेचे अध्यक्ष नरेश बगरे, चारुदत्त जोशी, दिलीप बापट उपस्थित होते.
२०० पेक्षा अधिकच्या विद्यार्थ्यांसाठी निधी देऊ
सध्या या संस्थेत २०० मुले असून, अनुदान नसल्यामुळे विद्यार्थी संख्या वाढविता येत नाही. प्रवेशासाठी इच्छुक असणाºया अन्य काही मुलांना संस्था सामावून घेऊ शकत नसल्याची बाब मंत्री पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. क्षमता असेल तेवढ्यांना प्रवेश द्या. अनुदानाव्यतिरिक्त लागणारा निधी ‘सीएसआर’मधून उपलब्ध करून देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
ं