विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात हॉटेल, बार, दारू दुकाने रात्री ११ नंतर बंद; आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 04:58 PM2024-10-22T16:58:06+5:302024-10-22T16:58:34+5:30

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीमुळे आज, मंगळवार (दि. २१ ऑक्टोबर) पासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येईपर्यंत कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रातील सर्व ...

Hotels, bars, liquor shops closed after 11 pm in Kolhapur in view of assembly elections | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात हॉटेल, बार, दारू दुकाने रात्री ११ नंतर बंद; आदेश जारी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात हॉटेल, बार, दारू दुकाने रात्री ११ नंतर बंद; आदेश जारी

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीमुळे आज, मंगळवार (दि. २१ ऑक्टोबर) पासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येईपर्यंत कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रातील सर्व हॉटेल, धाबे, रेस्टॉरंट, बार, परमिट रूम, देशी, विदेशी दारू दुकाने रात्री ११ नंतर बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने सोमवारी जारी केले. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील, असे त्यात म्हटले आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये हे आदेश लागू केले आहेत.

आंतरराज्य जिल्हा नाक्यांवर पोलिस, राज्य उत्पादनचे तपासणी पथक

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या आंतरजिल्हा व कर्नाटकमधील बेळगाव या आंतरराज्य नाक्यांवर पोलिस व राज्य उत्पादन शुल्कचे संयुक्त पथक तपासणीसाठी सज्ज असणार आहे. मंगळवारी वरील पाच जिल्हे व कर्नाटक प्रशासनाची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या नाक्यांवर सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे. शिवाय एसएसटी, एसएस पथके सज्ज असतील.

या बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयातून कायदा सुव्यवस्था नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, सहायक नोडल अधिकारी नितीन धापसे पाटील, नम्रता शिराणे यांच्यासह पाचही जिल्ह्यांमधील संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आजवर पोलिसांचे, राज्य उत्पादन शुल्कचे पथक स्वतंत्रपणे नियुक्त केले जात होते. पण यंदा दोन्ही विभागांचे संयुक्त पथकांद्वारे नाक्यांवर वाहनांची तपासणी केली जाणार आहे. कर्नाटक, गोवा राष्ट्रीय महामार्गावर चेकपोस्ट उभारण्यात येणार आहे. तसेच आंतरजिल्हा व आंतरराज्य नाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच असेल. निवडणुकीत मतदारांना मद्य, पैसा यांसह विविध गोष्टींचा प्रलोभने दाखविण्यासाठी वापर केला जाण्याची शक्यता आहे. हा प्रकार रोखण्यासाठी नाक्यांवर विशेष तपासणी पथके असणार आहेत.

Web Title: Hotels, bars, liquor shops closed after 11 pm in Kolhapur in view of assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.