ग्रामविकासावर राळेगणसिद्धीत तासभर संवाद, मुश्रीफ यांनी घेतली हजारे यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 03:31 PM2020-07-25T15:31:18+5:302020-07-25T15:33:27+5:30

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची शुक्रवारी राळेगणसिद्धी येथे तासभर ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीच्या कायद्यासह लोकसहभागातून ग्रामविकास व समृद्ध खेडी या विषयावर चर्चा झाली. .

An hour long dialogue on rural development in Ralegan Siddhi | ग्रामविकासावर राळेगणसिद्धीत तासभर संवाद, मुश्रीफ यांनी घेतली हजारे यांची भेट

राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) येथे शुक्रवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन ग्रामपंचायत प्रशासक नियुक्तीबाबत चर्चा केली.

googlenewsNext
ठळक मुद्देहसन मुश्रीफ यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट प्रशासक नियुक्तीसह ग्रामविकासावर झाला राळेगणसिद्धीत तासभर संवाद

कोल्हापूर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची शुक्रवारी राळेगणसिद्धी येथे भेट झाली. दुपारी तीन वाजता सुमारे तासभर ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीच्या कायद्यासह लोकसहभागातून ग्रामविकास व समृद्ध खेडी या विषयावर चर्चा झाली. ग्रामविकासावर चर्चा करण्यासाठी उभयतांमध्ये पुन्हा भेटण्याचे निश्चित करण्यात आले.

राज्याच्या ग्रामविकास विभागाने आठवडाभरापूर्वी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीच्या नवीन कायदा आणला. त्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून खासगी व्यक्तींच्या नियुक्तीबाबत नापसंती व्यक्त केली होती. मंत्री हसन मुश्रीफ यांनीही याबाबत, अण्णा हजारे यांची लवकरच भेट घेऊन सविस्तर चर्चा करू, असे पत्र लिहिले होते.

त्यानुसार अहमदनगर दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री मुश्रीफ यांनी राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी, अण्णा हजारे यांनी महात्मा गांधीजी यांनी सांगितल्याप्रमाणे निसर्ग, जमीन, पर्यावरण या साधनसंपत्तीवरच आपण गावे समृद्ध करू शकतो, असे सांगितले. अण्णा हजारे यांनी मंत्री मुश्रीफ यांना ग्रामविकास, गावाच्या विकासात लोकसहभाग, ग्रामसभेचे अधिकार, समृद्ध गावे या विषयांवरील पुस्तके भेट दिली.

अण्णांची नाराजी आणि मुश्रीफांचे स्पष्टीकरण

या भेटीत अण्णा हजारे यांनी खासगी व्यक्तीच्या ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीच्या कायद्याबाबत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, कोरोनासारख्या महामारीच्या परिस्थितीत गावगाडा सुरळीत चालण्यासाठी असाधारण परिस्थितीत हा कायदा करावा लागल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच उच्च न्यायालयाच्या न्यायालयीन बाबीबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले.
 

Web Title: An hour long dialogue on rural development in Ralegan Siddhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.