घरफाळ्यात सवलत; पण वेळेचा अपव्यय

By admin | Published: June 26, 2017 12:55 AM2017-06-26T00:55:17+5:302017-06-26T00:55:17+5:30

घरफाळ्यात सवलत; पण वेळेचा अपव्यय

House discounts; But time wastage | घरफाळ्यात सवलत; पण वेळेचा अपव्यय

घरफाळ्यात सवलत; पण वेळेचा अपव्यय

Next


गणेश शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महापालिकेच्या उत्पन्नातील स्रोतांपैकी एक महत्त्वाचा स्र्रोत म्हणजे घरफाळा आहे. दरवर्षीप्रमाणे चालू आर्थिक वर्षातील मिळकतधारकांना पावणेतीन महिन्यांत सहा टक्के सवलतीमुळे गतवर्षीपेक्षा दुप्पट रक्कम घरफाळा विभागाच्या तिजोरीत यंदा जमा झाली; पण घरफाळा भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना नागरी सुविधा केंद्रामध्ये कमी मनुष्यबळामुळे तासन्तास ताटकळत उभे राहावे लागत असल्यामुळे मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
शहरातील नागरिकांनी वेळेत व नियमितपणे घरफाळा (मिळकर कर) भरावा या उद्देशाने महापालिकेच्या घरफाळा विभागाने सात वर्षांपासून सुरू केलेल्या विविध सवलतींचा फायदा मिळकतधारकांना होत आहे. कोल्हापुरात सध्या सुमारे एक लाख ४६ हजार मिळकतधारक आहेत. ए, बी, सी, डी आणि ई वॉर्ड अशा वॉर्डांत लोकवस्ती आहे. विशेषत: ए आणि ई वॉर्डांचे क्षेत्रफळ मोठे असल्याने तेथे मिळकतधारकांची संख्या जास्त आहे. या आर्थिक वर्षातील घरफाळा भरणाऱ्या मिळकतधारकांना चालू बिलामध्ये पहिल्या तीन महिन्यांसाठी सहा टक्के, जुलै ते सप्टेंबरसाठी चार टक्के आणि आॅक्टोबर ते नोव्हेंबरसाठी दोन टक्के अशी सवलत आहे. यासाठी नागरी सुविधा केंद्रांसह तीन खासगी बँका आणि या बँकांच्या १५ शाखांमधून धनादेश भरण्याची सोय केली आहे. त्याचबरोबर ज्या मिळकतधारकांना बँकांमध्ये धनादेश भरावयाचा आहे, त्यांनी तो मुदतीपूर्वी भरावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील मिळकतधारकांना पूर्ण कराच्या रकमेवर पहिल्या तीन महिन्यांसाठी असलेल्या सहा टक्के सवलतीचा फायदा यंदा गुरुवार (दि. २२) अखेर तब्बल ३४ हजार ७०० मिळकतधारकांना मिळाला आहे. यामधून १३ कोटी ३८ लाख रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले. यामध्ये घरगुती मिळकतधारकांसह विशेषत: व्यावसायिक व औद्योगिक मिळकतधारकांचा यात समावेश आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत एक एप्रिल ते २२ जून २०१६ अखेर १४ हजार ४८ मिळकतधारकांकडून केवळ सात कोटी आठ लाख रुपये जमा झाले होते. यामुळे शहरातील महापालिकेच्या मुख्य इमारतीसह पाच नागरी सुविधा केंद्रांमध्ये नागरिकांच्या रांगा लागल्याचे दिसते. सकाळी साडेआठ वाजल्यापासून ते दुपारपर्यंत असे चित्र असते. याचे काम सात वर्षांपासून एचसीएल इन्फोटेक या कंपनीकडे आहे. या पाच नागरी सुविधा केंद्रांत सुमारे ३० कर्मचारी कार्यरत आहेत.
आॅनलाईनला पसंती
गेल्या वर्षी आॅनलाईनमधून केवळ दोन मिळकतधारकांनी ३२२९ रुपये भरले होते. पण, यंदा आॅनलाईनला प्रतिसाद वाढला आहे. १ एप्रिल ते २२ जून २०१७ अखेर १४०२ मिळकतधारकांकडून सुमारे ४६ लाख रुपये जमा झाले असल्याचे घरफाळा विभागाने सांगितले.

Web Title: House discounts; But time wastage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.