हात, भांडी धुतलेल्या पाण्यातून झाडे जगविली
By admin | Published: May 18, 2016 01:00 AM2016-05-18T01:00:11+5:302016-05-18T01:01:27+5:30
प्रतिदिन २०० लिटर पाण्याची बचत : मंगेशकर नगरमधील सांगलीकर कुटुंबीयांचा उपक्रम
पुणे : पुणे जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली असून, समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट तर महावितरणचे मुख्य अभियंता रामराव मुंडे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
महावितरणचा कारभार पारदर्शक व प्रभावीपणे चालविण्यासाठी तसेच ग्राहकांना उत्तम व दर्जेदार सेवा मिळावी, यासाठी राज्य शासनाने जिल्हा व तालुका विद्युत वितरण नियंत्रण समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी ही समिती नुकतीच गठीत केली आहे. या समितीचे सदस्य म्हणून जिल्ह्यातील सर्व आमदार, महापौर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी, महापालिकांचे आयुक्त, विविध शासकीय कार्यालयांचे प्रमुखांसह महावितरणचे अधीक्षक अभियंता तसेच घरगुती, व्यापारी, औद्योगिक व कृषी ग्राहकांच्या प्रतिनिधींचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. यात अशासकीय सदस्य म्हणून संतोष सौंदणकर (व्यावसायिक), राजेंद्र भुजबळ (औद्योगिक), भरत कुंभारकर (कृषी), विश्वास ननावरे (घरगुती) तसेच वीज वितरण क्षेत्रात कार्यरत असणारे नितीन गुजराथी व महेंद्र कांबळे या ग्राहक प्रतिनिधींची निवड करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)