रिक्षावाल्याकडे दहा हजार कोटींची मालमत्ता कशी?, शरद कोळी यांचा प्रश्न 

By भीमगोंड देसाई | Published: September 14, 2023 03:32 PM2023-09-14T15:32:16+5:302023-09-14T15:34:18+5:30

कोल्हापुरात शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचा मेळावा

How can a rickshaw puller have assets of ten thousand crores, Sharad Koli question | रिक्षावाल्याकडे दहा हजार कोटींची मालमत्ता कशी?, शरद कोळी यांचा प्रश्न 

रिक्षावाल्याकडे दहा हजार कोटींची मालमत्ता कशी?, शरद कोळी यांचा प्रश्न 

googlenewsNext

कोल्हापूर : शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे आजारी असताना चाळीस गद्दार गुजरात, गुवाहाटीमार्गे जात भाजपच्या वळचणीला जाऊन सत्तेवर आले. ठाकरे यांनी त्यांना आमदार, खासदार मंत्री केले तरीही त्यांनी निष्ठा गुंडाळून ठेवली. सत्तेत गेल्यानंतर ठाकरे यांच्या मालमत्तेविषयी बोलणाऱ्या रिक्षावाल्याने दहा हजार कोटींची मालमत्ता कशी जमवली असा प्रश्न ठाकरे गट शिवसेना युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता विचारला. येथील सूर्या हॉलमध्ये आयोजित शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

ते म्हणाले, अजित पवार निधी देत नाहीत, आम्हाला अडचणीत आणत आहेत. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो असे ४० गद्दार सांगत होते. आता तेच अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. कोंबडी, सायकल चोर, पाणपट्टीवाल्यांना आमदार करून मंत्री केले. तेच आता ठाकरे यांच्यावर टिका करीत आहेत. त्यांना २०२४ च्या निवडणुकीत जनता धडा शिकवले. 

निवडणूक आयोग, ईडी भाजपची सालगडी बनली आहे. यामुळे सामान्यांना न्याय मिळणे अवघड झाले आहे. कोकणातील दीडफुट्या तर वारंवार उध्दव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करीत असतो. त्याला भाजपने यासाठीच नेमला आहे. भाजपचा जनाधार कमी होत असल्याने जातीय दंगल घडवून आणण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसैनिकांनी सावध राहिले पाहिजे.

जिल्हाप्रमुख् संजय पवार म्हणाले, आगामी काळात लोकसभा, विधानसभेच्या व इतर निवडणुका लागणार आहेत. यामुळे शिवसैनिकांनी कामाला लागावे. रविकिरण इंगवले, विशाल देवकुळे, सुनील मोदी यांची भाषण झाली. यावेळी दिनेश साळवी, प्रतिज्ञा उत्तूरे, महेश उत्तूरे, अवधूत साळोखे, मंजीत माने, राजू यादव, विनोद खोत, विराज पाटील, प्रियंका माने आदी उपस्थित होते.

Web Title: How can a rickshaw puller have assets of ten thousand crores, Sharad Koli question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.