निधी आणायचा आम्ही, उद्घाटनं परस्पर कशी करता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 10:58 AM2019-06-05T10:58:44+5:302019-06-05T11:05:21+5:30

कोल्हापूर : शासनाकडून निधी आणायचा आम्ही आणि केलेल्या कामांचे श्रेय घेण्याकरिता तुम्ही परस्पर उद्घाटने कशी काय करता? असा खडा ...

How do we interact with the inauguration fund? | निधी आणायचा आम्ही, उद्घाटनं परस्पर कशी करता?

निधी आणायचा आम्ही, उद्घाटनं परस्पर कशी करता?

Next
ठळक मुद्देनिधी आणायचा आम्ही, उद्घाटनं परस्पर कशी करता?आ. महाडिक यांचा सवाल : प्रोटोकॉलचे भान ठेवा

कोल्हापूर : शासनाकडून निधी आणायचा आम्ही आणि केलेल्या कामांचे श्रेय घेण्याकरिता तुम्ही परस्पर उद्घाटने कशी काय करता? असा खडा सवाल आमदार अमल महाडिक यांनी आयुक्तांसमोरच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मंगळवारी विचारला. ज्यांनी निधी आणला, त्यांना साधे निमंत्रण देण्याचे तसेच प्रोटोकॉल सांभाळण्याचे भान ठेवा, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. यापुढे असला प्रकार खपवून घेणार नाही, असा इशाराही महाडिक यांनी अधिकाऱ्यांना दिला.

महानगरपालिका आयुक्त कार्यालयात आमदार अमल महाडिक यांनी शासकीय निधीतून सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्याकरिता आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना पत्र दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आमदार कधी नव्हे इतके आक्रमक झाले आणि त्यांनी अधिकाºयांना आयुक्तांसमोरच झापले.

शहरात एलईडी बल्ब लावण्याचा प्रकल्प केंद्र सरकारचा असून तो पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार महाडिक यांनी मंजूर करून आणला होता; परंतु गेल्या आठवड्यात लावण्यात आलेल्या एलईडी बल्बच्या कामाचा प्रारंभ आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते झाला. हाच मुद्दा बैठकीत कळीचा ठरला.

सुमारे आठ कोटी रुपये खर्च करून एलईडी बल्ब लावण्यात येत आहेत. त्याच्या प्रारंभाचा कार्यक्रम संयुक्तपणे ठेवायला पाहिजे होता. ‘तुम्ही मला तसेच पालकमंत्र्यांनाही त्याबाबत निमंत्रण दिले नाही. असे व्हायला नको होते. तुम्ही परस्पर कसा प्रारंभ केलात?’ असा सवाल महाडिक यांनी विचारला.

‘तो कार्यक्रम प्रशासनाने ठेवला नव्हता,’ असा खुलासा शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी केला. तेव्हा महाडिक आणखी भडकले. ‘जर प्रशासनाने कार्यक्रम ठेवला नव्हता तर अधिकारी तेथे कसे गेले याचे उत्तर द्या, अशा शब्दांत त्यांंनी झाडले. ‘तुम्ही कामाची उद्घाटने करताना सर्वांनाच बोलवा. शासकीय प्रोटोकॉल सांभाळा,’ असे त्यांनी सुचवले.

येथून पुढे शासकीय निधीतून मिळालेल्या अमृत योजना, पाणीपुरवठा पाईप प्रारंभ, प्रधानमंत्री आवास योजना, अंबाबाई मंदिर परिसर विकासकामाचा प्रारंभ यांसह कोणतेही कार्यक्रम परस्पर करू नका,. मी स्वत: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उद्घाटनाकरिता आणणार आहे. त्याकरिता तुमच्याकडून तारीख निश्चित करावी व मला कळवावी, असे महाडिक यांनी आयुक्तांना सांगितले.

शहरातील सर्व नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळण्याकरिता आयुक्तांनी जिल्हाधिकाºयांबरोबर बैठक घ्यावी आणि लवकरात लवकर प्रॉपर्टी कार्ड मिळतील याची व्यवस्था करावी, पुनर्वसित झोपडपट्टीतील जागा या संबंधित १२४० झोपडीधारकांना लीजवर देऊन त्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्याची व्यवस्था करावी.

रंकाळा तलावाभोवती गोल्डन नेकलेसकरिता दोन कोटींचा निधी तांत्रिक अडचणीमुळे थांबला असल्याने तांत्रिक अडचण दूर करावी, काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना, शिंगणापूरअंतर्गत जलवाहिनी टाकण्याची कामे जलद गतीने करा, अग्निशमन दलाकडे टर्न टेबल लॅडर वाहनखरेदीचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडून मागून घ्या, अशा सूचना महाहिक यांनी दिल्या. यावेळी महापालिकेचे सर्व अधिकारी, विरोधी पक्षनेते विलास वास्कर, भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी, नगरसेवक किरण नकाते उपस्थित होते.

आमदार निधी वापरण्याचे आदेश द्या

आमदार फंडातून दक्षिण मतदारसंघात जेथे निधी देण्यात आला आहे, तो त्या कामावर तातडीने खर्च करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना द्या, अशी सूचना महाडिक यांनी आयुक्त कलशेट्टी यांना केली. राजलक्ष्मीनगर प्रभागात निधी वापरू नका, असे नगरसेविकेने अधिकाऱ्यांना सांगितले आहे. जर असे प्रकार घडत असतील तर आयुक्तांनी आपल्या अधिकारात ही कामे पूर्ण करावीत, अशी सूचना केली. संबंधित नगरसेवकांशी मी स्वत: बोलून कामे करून घेण्यास सांगतो, असे आयुक्तांनी सांगितले.

 

Web Title: How do we interact with the inauguration fund?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.