कर्मचाºयांच्या तरतुदीविना जिल्हा बँकेचा ताळेबंद खरा कसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 09:07 PM2017-09-13T21:07:59+5:302017-09-13T21:13:03+5:30

कोल्हापूर : कर्मचाºयांच्या देणी रकमेची तरतूद न करता जिल्हा बँकेच्या प्रशासनाने सभासदांना सादर केलेला ताळेबंद खरा कसा? असा सवाल करत कर्मचाºयांच्या मागण्यांबाबत

 How to make the balance of the district bank without the provisions of the employees | कर्मचाºयांच्या तरतुदीविना जिल्हा बँकेचा ताळेबंद खरा कसा

कर्मचाºयांच्या तरतुदीविना जिल्हा बँकेचा ताळेबंद खरा कसा

Next
ठळक मुद्देप्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेकर्मचाºयांचे लाखो रुपये बँकेकडे अडकून राहिले आहेतरोजंदारी कर्मचाºयांवरच बहुतांशी शाखांचा डोलारा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कर्मचाºयांच्या देणी रकमेची तरतूद न करता जिल्हा बँकेच्या प्रशासनाने सभासदांना सादर केलेला ताळेबंद खरा कसा? असा सवाल करत कर्मचाºयांच्या मागण्यांबाबत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी केला.

अनुकंपाखालील कर्मचाºयांना सामावून घ्या, रोजंदारी कर्मचाºयांना नियमित करा यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचाºयांना मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी दुसºया दिवशी विविध शाखांतील १६८ कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी बँक प्रशासनावर सडकून टीका केली. कर्मचाºयांच्या फरकाची रक्कम गेली अनेक वर्षे बँकेने दिलेली नाही. अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत, कर्मचाºयांचे लाखो रुपये बँकेकडे अडकून राहिले आहेत; पण या रकमेची तरतूद बँकेने आपल्या ताळेबंदात केलेली नाही.

कर्मचाºयांच्या देणे रकमेची तरतूद न करता बँकेने चुकीचा ताळेबंद सभासदांसमोर सादर केल्याचा आरोप पाटील यांनी केला. गेले अनेक वर्षे कर्मचारी आपल्या हक्कांच्या मागण्यांसाठी प्रयत्न करत असताना प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे; पण कर्मचाºयांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले.यावेळी बँक एम्प्लाईज युनियनचे अध्यक्ष अतुल दिघे, दिलीप पवार, एस. डी. पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

प्रलंबित रकमेबाबत न्यायालयाचे आदेश
कर्मचाºयांच्या देण्याबाबत औद्योगिक न्यायालयाने पाच-सहा दिवसांपूर्वी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या रकमेची ताळेबंदाला तरतूद करण्याबाबतचे आदेश न्यायालयाने दिल्याचेही भगवान पाटील यांनी सांगितले.

रोजंदारीवर जबाबदारी कशी देता?
बॅँकेत गेले नऊ-दहा वर्षांपासून शंभर कर्मचारी रोजंदारीवर काम करत आहेत. तब्बल २७ शाखांत केवळ दोन-दोन कर्मचारी काम करत आहेत. बँकेची गरज व कर्मचाºयांची संख्या पाहता रोजंदारी कर्मचाºयांवरच बहुतांशी शाखांचा डोलारा सुरू आहे. त्यांना नियमित करत नाहीत तर त्यांना जोखमीचे काम का देता? असा सवाल ही पाटील यांनी केला.

विविध मागण्यांसाठी जिल्हा बँकेच्या कर्मचाºयांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी विविध शाखांतील १६८ कर्मचाºयांनी सहभागी होऊन घोषणाबाजी केली.
 

 

Web Title:  How to make the balance of the district bank without the provisions of the employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.