दारुची विल्हेवाट किती प्रकरणात लावली; पोलिसांकडून तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:37 AM2021-02-26T04:37:41+5:302021-02-26T04:37:41+5:30
कोल्हापूर : तपासणीसाठी आलेली कारवाईतील दारू ढोसल्याप्रकरणी अटकेतील प्रयोगशाळेतील सहा कर्मचाऱ्यांनी आणखी किती प्रकरणात अशा पद्धतीने ‘गोलमाल’ केला, याचा ...
कोल्हापूर : तपासणीसाठी आलेली कारवाईतील दारू ढोसल्याप्रकरणी अटकेतील प्रयोगशाळेतील सहा कर्मचाऱ्यांनी आणखी किती प्रकरणात अशा पद्धतीने ‘गोलमाल’ केला, याचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, फरारी संशयित लॅब असिस्टंट मिलिंद शामराव पोटे (४९, रा. कलानगर, इचलकरंजी) याचा पोलीस शोध घेत आहेत.
चार जिल्ह्यांतील पोलीस ठाणे तसेच उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईतील जप्त दारू तपासणीकरिता ताराराणी चौकातील न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवली. ती दारू तपासणीपूर्वीच सात कर्मचाऱ्यांनी पिऊन फस्त केली. तक्रारीनंतर शाहुपूरी पोलिसांनी प्रयोगशाळेतील वाहन चालक वसंत गौड (४७, रा. कसबा बावडा), वरिष्ठ सहायक अक्षयकुमार मालेकर (रा. न्यू शाहुपुरी), कंत्राटी कर्मचारी मारुती भोसले (३४, रा. शाहुपुरी २ री गल्ली), राहुल चिले (३५, रा. फुलेवाडी ४ था स्टॉप), गणेश सपाटे (३०, रा. बुरुड गल्ली), विरुपाक्ष पाटील (२५, रा. विचारेमाळ) यांना बुधवारी अटक केली. लॅब असिस्टंट मिलिंद पोटे हा फरारी आहे.
दरम्यान, अटकेतील संशयितांकडे गुरुवारी पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी ही दारू तपासणी करण्यापूर्वीच परस्पर ढोसून संपविल्याचे तपासात पुढे आले. संशयीतांनी आणखी किती प्रकरणात अशा पध्दतीने दारुची विल्हेवाट लावली, याचाही पोलीस शोध घेत आहेत.