किती नेते, कार्यकर्त्यांवर कारवाई करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 01:00 AM2019-04-04T01:00:29+5:302019-04-04T01:00:34+5:30

कोल्हापूर : यंदा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झालेल्या विचित्र राजकीय परिस्थितीमुळे किती नेते आणि कार्यकर्त्यांवर कारवाई करायची असा पेच ...

How many leaders, activists will take action? | किती नेते, कार्यकर्त्यांवर कारवाई करणार?

किती नेते, कार्यकर्त्यांवर कारवाई करणार?

Next

कोल्हापूर : यंदा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झालेल्या विचित्र राजकीय परिस्थितीमुळे किती नेते आणि कार्यकर्त्यांवर कारवाई करायची असा पेच राजकीय पक्षांसमोर निर्माण झाला आहे. राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांची सरमिसळ झाल्याचा हा परिणाम जाणवत आहे.
एकीकडे आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याविरोधात थेट मोहीम उघडली आहे. त्यांना मानणारे कोल्हापूर महापालिकेतील काँगे्रसचे २५ हून अधिक नगरसेवक हे थेट मंडलिक यांच्या प्रचारातच आहेत. त्यातील उपमहापौर भूपाल शेटे यांनी ‘कारवाई झाली तरी बेहत्तर,’ अशी जाहीर भूमिका घेतली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस सर्व नगरसेवकांवर काय कारवाई करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आजऱ्यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव श्ािंपी आणि त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी मंडलिक यांचा तर आजºयातील भाजपमधील काहींनी महाडिक यांचा प्रचार सुरू केल्याची तक्रार दोन्ही पक्षांकडे आली आहे.
गडहिंग्लजमध्ये श्रीपतराव शिंदे यांच्या पक्षाने राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला असला तरी त्यांचे सर्वच कार्यकर्ते आघाडीसोबत राहतील याची शाश्वती देता येत नसल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादीतील आणखी काही नेते आणि प्रमुख कार्यकर्ते हे मंडलिकांच्या प्रचारात कसे आहेत, याचा पवार यांच्या व्हॉटस् अ‍ॅपवर रोज मेसेज जात आहे. भाजपनेही माजी स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ काढली आहे. ढवळे हे महाडिक यांच्या प्रचारात असल्याचा आरोप आहे. मात्र, हीच परिस्थिती अनेक तालुक्यांमध्ये असून दोन्ही काँग्रेसचे काही कार्यकर्ते मंडलिकांच्या पाठीशी तर भाजप-शिवसेनेतील काहींचा महाडिक यांना छुपा पाठिंबा असे चित्र कोल्हापूर मतदारसंघात दिसून येत आहे. त्यामुळे किती नेते आणि कार्यकर्त्यांवर कारवाई करायची, असा प्रश्न पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. आचारसंहितेच्या गुन्ह्णांचे नंतर काय होते ते कळत नाही, अशीच परिस्थिती या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईबाबत होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान वातावरण तयार करण्यासाठी अशाप्रकारचे इशारे दिले जातात; परंतु नंतर पक्षाची गरज म्हणून पुन्हा निलंबन मागे घेतल्याचीही उदाहरणे आहेत.

Web Title: How many leaders, activists will take action?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.