वंशाच्या दिव्यात किती नकुशी होरपळणाऱ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 09:27 PM2017-08-30T21:27:59+5:302017-08-30T21:38:40+5:30
कोल्हापूर : ‘घराण्याला वंशाचा दिवा हवाच,’ या पुरुषसत्ताक मानसिकतेतून आजही मातेच्या गर्भात स्त्रीभ्रूणाची हत्या होते. कधी-कधी जन्मदाती आईच नवजात मुलीसाठी मृत्यूची शय्या तयार करते, हे विदारक वास्तव आहे. स्त्रीच्या गर्भातून मुलगी जन्माला यावी की मुलगा याला मुख्यत्वे पुरुषच जबाबदार असताना स्त्रीला मात्र कौटुंबिक आणि सामाजिक दबावामुळे मुलीची हत्या करण्याचे पाऊल उचलावे लागते. दुसरीकडे, अशा गुन्'ाला कारणीभूत असलेले पुरुष मात्र कायद्याच्या कचाट्यातून नामानिराळे राहिले आहेत. या ‘वंशाच्या दिव्या’चा अट्टहास आणखी किती मुलींचे आयुष्य होरपळून टाकणार, हा मुख्य सामाजिक प्रश्न आहे.
स्त्री-समानतेच्या कितीही कथा सांगितल्या जात असल्या तरी मंगळवारी (दि. २९) गडमुडशिंगी येथे मातेने मुलीला जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याची घटना म्हणजे अजूनही पुरुषी सत्तेचे आणि अहंकाराचेच द्योतक आहे. पहिल्या पत्नीला चार मुलीच झाल्याने नवºयाने तिला सोडून दुसरे लग्न केले. दुसºया पत्नीलाही ‘मुलगाच जन्मला पाहिजे,’ अशी तंबी देण्यात आली. मात्र पाचवीही मुलगीच झाली आणि तीही थोडीशी व्यंग असलेली; त्यामुळे मातेने आणि आजीनेच मिळून मंगळवारी नवजात मुलीला खड्ड्यात पुरून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या जीवनाची दोरी बळकट म्हणून ती वाचली. या प्रकरणी आई आणि आजीवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र तिला हे पाऊल उचलायला भाग पाडणारी सासरची मंडळी आणि विशेषत: पती ‘मी नाही त्यातला’ म्हणून मुक्तपणे समाजात वावरतो. स्त्री मात्र पुन्हा समाजाच्या दृष्टीने गुन्हेगार ठरते.तेकडूनच नवजात मुलीचा खून झाला. तिला रस्त्यावर, कचराकुंडीत, कधी मंदिराच्या दारात सोडले जाते. या घटना प्रकाशात आल्या की ‘माता तू न वैरिणी’ अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध होतात. महासत्तेच्या दिशेने पाऊल टाकणाºया भारतात मात्र पुरुषप्रधान संस्कृती आणि वारसा या समजुतीची मुळे समाजमनात इतक्या खोलवर रुजली आहेत की, त्या मानसिकतेत खुनासारखा गुन्हा करण्यासाठीही मागे-पुढे पाहिले जात नाही. त्यासाठी महिलेला हतबल केले जाते. मुळातच चार मुली असलेल्या पुरुषाशी लग्न करणे आणि मुलगी झाली म्हणून पती नांदवणार नाही या भीतीपोटी मातेने हे पाऊल उचलणे म्हणजे तिच्यावर किती वाईट पद्धतीने दबाव टाकला गेला असेल याचा विचार व्हायला हवा. आज तिच्यावर आणि आजीवर गुन्हा नोंद झाला; पण पतीने वंशाच्या दिव्याचा हट्ट सोडला नाही. हा दिवा अजून किती नकोशींचे आयुष्य जाळत जाणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
मुलगा-मुलगी पुरुषावरच अवलंबून
स्त्रीमध्ये एक्स गुणसूत्रे असतात. पुरुषांमध्ये एक्स आणि वाय अशी दोन गुणसूत्रे असतात. स्त्रीबीजाशी पुरुषाच्या एक्स गुणसूत्राचे फलन झाले की मुलगी आणि वाय गुणसूत्राचे फलन झाले की मुलगा जन्मतो. त्यामुळे स्त्रीच्या गर्भातून मुलगा जन्मावा की मुलगी याला पुरुषच सर्वस्वी जबाबदार ठरतो. मा़त्र जोपर्यंत समाजाची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत अशा प्रकारच्या घटना घडतच राहणार.
- डॉ. सतीश पत्की
नवरा सोडून देईल या भीतीपोटी मातेलाच मुलीला जिवे मारण्यापर्यंतचे पाऊल उचलावे लागते, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्याकडे अजूनही विवेकाने लग्न केले जात नाही. पुरुषी मानसिकतेने स्त्रीच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण केला आहे. अशा प्रकरणांमध्ये आधी पुरुषावर गुन्हा नोंद होऊन त्याला शिक्षा झाली पाहिजे.
- तनुजा शिपूरकर (सामाजिक कार्यकर्त्या)
कायद्यानुसार या गुन्'ात स्त्री दोषी दिसत असली तरी तिच्यावर मुलगाच पाहिजे याचा किती दबाव असेल हे गुन्'ातूनच सिद्ध झाले आहे. पुरुषी अहंकाराखाली स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्वच नाकारले गेले आहे. गावातील शेजाºयांनी ही घटना उघडकीस आणून मुलीला वाचविले हेही नसे थोडके; पण हे परिवर्तन समाजातील तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे.
- डॉ. शुभदा दिवाण (समुपदेश