रस्त्यांची ‘वाट’ आणखी किती?

By admin | Published: January 29, 2015 12:21 AM2015-01-29T00:21:23+5:302015-01-29T00:33:37+5:30

हसन मुश्रीफ यांच्याकडून पाहणी : नगरोत्थान प्रकल्प चार वर्षे रखडल्याची खंत

How much is the road? | रस्त्यांची ‘वाट’ आणखी किती?

रस्त्यांची ‘वाट’ आणखी किती?

Next

कोल्हापूर : ‘शहरातील रस्त्यांवरून फिरताना लाज वाटते’ अशी सहा महिन्यांपूर्वी आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदावर असताना जाहीर टोचणी देऊनही १०८ कोटी रुपयांचा नगरोत्थान रस्ते प्रकल्प रखडला. मुश्रीफ यांनी शहरात पुन्हा नव्याने सुरू झालेल्या या रस्त्यांची आज, बुधवारी पाहणी केली. ‘तुमच्या अडचणी अनेक असतात’ अशी टोचणी देत, ‘कोणाला फोन करायचा सांगा, करतो. मात्र, आता तरी प्रकल्प मार्गी लावा’, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी वेळेत रस्ते करून शहरवासीयांना दिलासा देण्याच्या सूचना प्रशासनासह पदाधिकाऱ्यांना दिल्या.
कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी २७ जुलै २०१४ ला हसन मुश्रीफ यांनी किमान दिवाळीपूर्वी संपूर्ण शहरातील रस्ते चकचकीत करा, असा सल्ला दिला होता. दिवाळी होऊन चार महिने झाले तरी प्रकल्पाचे काम सुरूच आहे, याच रस्ते प्रकल्पाची पाहणी आज पुन्हा मुश्रीफ यांनी पदाधिकाऱ्यांसह केली. यापूर्वीही २६ जुलै २०१३ रोजीही नगरोत्थानचा मुश्रीफ यांनी पंचनामा केला होता. मात्र, आजही प्रकल्प कासवगतीनेच सुरू आहे.
कणेरकरनगर, तुळजाभवानी कॉलनी, साळोखेनगर, फुलेवाडी-रिंगरोड, हॉकी स्टेडियम ते कळंबा जेल, जरगनगर, राजारामपुरी आदी परिसरातील रस्त्यांची मुश्रीफ यांनी आज पाहणी केली. त्यातील बहुतांश रस्ते पूर्णत्वाकडे आहेत. राजारामपुरी परिसरातील रस्ता व कामे निर्माण कन्स्ट्रक्शनचे अनिल पाटील यांना येत्या दोन आठवड्यांत पूर्ण करण्याच्या सूचना मुश्रीफ यांनी दिल्या.
प्रभागात फिरताना त्या-त्या भागांतील नगरसेवक नगरोत्थनाबाबत व्यथा सांगत होते. गेली चार वर्षे प्रकल्प रखडल्याने त्याचे ‘पाप’ आमच्या माथी मारले जात आहे. नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे, वर्तमानपत्रांतून दररोज उलट-सुलट छापून येत आहे, तुम्ही या अडचणींतून मार्ग काढा, अशी विनंती पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावर मुश्रीफ यांनी प्रकल्प रखडण्यात अनेक अडचणी आहेत? असे सूचक विधान करत टोचणी घेतली.
स्थायी समिती सभापती आदिल फरास, गटनेता राजू लाटकार, नगरसेवक परिक्षित पन्हाळकर, सुनील पाटील, सुभाष भुर्के, माधुरी नकाते, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार, कार्यकारी अभियंता एस. के. माने, साहाय्यक अभियंता हर्षदीप घाटगे आदी उपस्थित होते.

Web Title: How much is the road?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.